२५ सिलेंडरचे स्फोट झाल्यानंतर तब्बल १९८ अवैध सिलेंडर जप्त

577

– गॅस एजन्सीजच्या साहाय्याने काळ्या बाजारात होणाऱ्या गॅस विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर
The गडविश्व
पुणे : येथील कात्रज भागात अवैधरित्या साठा करण्यात आलेल्या २५ गॅस सिलेंडरचे २८ मार्च रोजी  स्फोट झाले. यामुळे गॅस एजन्सीजच्या साहाय्याने काळ्या बाजारात होणाऱ्या गॅस विक्रीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुरवठा विभागाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधे गेल्या काही दिवसांमधे तब्बल १९८ अवैध सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.
पुण्यात काल एकामागोमाग एक झालेल्या या स्फोटांनी पुण्यातील कात्रजच्या टेकडीचा परिसर हादरून गेला होता. एका पत्र्याच्या शेडमधे साठवून ठेवण्यात आलेल्या गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतला आणि गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठवणूक कशी केली जाते हे पुन्हा एकदा उघडकीस आले. पण अशाप्रकारे घरघुती वापराच्या गॅसची साठवणूक करण्याची ही एकमेव घटना नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांमधे मिळून आठ अवैध साठ्यांवर कारवाई करुन १९८ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहे.
गॅसचा हा काळा बाजार गॅस एजन्सीजच्या सहभागाशिवाय अशक्य असल्याच जाणकारांचे म्हणणे आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधे घरगुती वापराच्या गॅसच्या पुरवठ्यासाठी ११८ गॅस एजन्सीज आहेत. मात्र या गॅस एजन्सीजकडून वितरीत होणारे सिलेंडर अधिकृत गॅस धारकांपर्यंत पोहचत नसल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here