The गडविश्व
गडचिरोली : आजादी का अमृत महोत्सव निमित्त महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत,देशभरात आरोग्य शिबीर साजरा करण्यात येत असून २१ एप्रिल २०२२ रोजी ग्रामीण रुग्णालय, कुरखेडा येथे सकाळी १०.०० ते ४.०० वाजेपर्यंत भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केलेले आहे. सदर शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ, दंत चिकित्सक, भिषक तज्ञ, नेत्र चिकित्सक, सर्जन, बालरोग तज्ज्ञ, अस्थीरोग तज्ज्ञ, नाक घसा तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, मुखरोग तज्ञ, आदी विशेषतज्ज्ञ मंडळी उपस्थित राहून रुग्णांना रुग्णसेवा देणार आहे. तसेच आयुष्यामान भारत डिजीटल मिशन अंतर्गत रुग्णांची नोंदणी व हेल्थ ID कार्ड तयार करण्यात येईल,तसेच महात्मा ज्योतीरास फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत गोल्डन ID तयार करुन देण्यात येईल.तरी अधिका अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. कमलेश परसवानी वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनिष रामटेके तालुका आरोग्य अधिकारी कुरखेडा यांनी केले आहे.