– स्पर्धकांनी याकरीता सहभाग नोंदविण्याचे आवाहन
गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे उद्या १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता रानभाजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक स्पर्धकांना आपआपली पाककृती तयार करुन स्पर्धेत सामील होता येणार असून प्रवेश फी नि:शुल्क आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी याकरीता सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ,कृषि विज्ञान केंद्र , सोनापूर –गडचिरोली यांनी केले आहे.