स्वयं रक्तदाता जिल्हा समितीच्या पुढाकाराने आरमोरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

290

– स्वयं रक्तदाता जिल्हा समितीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
The गडविश्व
गडचिरोली : अचानक जिल्हा रक्तपेढीमध्ये रक्तगट A व AB (पॉझिटिव्ह) आणि A निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा पडल्याने रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी कडक उन्हात ३५ किलोमीटर गडचिरोलीला प्रवास करून जावे लागते. त्यामुळे रक्तदात्यांचा येण्या-जाण्याचा त्रास दूर व्हावा याकरिता थेट जिल्हा रक्तपेढीच्या चमू ला स्वयं रक्तदाता जिल्हा समितीच्या वतीने आरमोरी येथे बोलावून उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे रक्तदानाची व्यवस्था केली.
या रक्तदान शिबिरामध्ये अभि हेमके, उमाकांत तुळशीगिरी, विकास रामटेके, सचिन कोटगले, सागर मांढरे, राहुल हर्षे, लीलाधर मेश्राम, योगेश सिलार, पंकज सिलार, अनुप गौतम, हिमांशू मातेरे, अविनाश देशमुख, अजय सूर्यवंशी, अजय चाटारे, चंद्रहास मेश्राम इत्यादी १४ रक्तदात्यांनी स्वेच्छिक रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबिर स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत यांच्या मार्गदर्शनात मनोज गेडाम, लीलाधर मेश्राम, राहुल जुवारे, प्रफुल खापरे, तुषार भोयर, रोहित बावनकर, सुरज पडोळे, किरणापुरे, विलास गोंधोळे, दिनेश देशमुख, देवेंद्र कुथे, गुरु वाडगुरे यांच्या सहकार्याने पार पडला.
यावेळी डॉ. शेख, डॉ. मारबते जिल्हा रक्तपेढीचे कर्मचारी श्रीमती समता खोबरागडे, कु. मोहिनी चुटे, कु. ग्रीष्मा बोरकर, देशमुख सर, बंडू कुंभारे यांनी मोलाची भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here