स्वयं रक्तदाता जिल्हा समितीकडून नारदेलवार कुटुंबास दुसऱ्या टप्प्यातील सानुग्रह निधीचे वितरण

320

The गडविश्व
गडचिरोली : ‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ च्या वतीने नारदेलवार कुटुंबास दुसऱ्या टप्प्यातील सानुग्रह निधी वितरीत करण्यात आले. २ हजार रुपये असे दुसऱ्या टप्प्यातील निधी असून एकूण सानुग्रह निधी हि २० हजार रुपये एवढी आहे. ती १० टप्यात देण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव/ ठाणेगाव येथील रक्तदाता ओमकार भोलेनाथ नारदेलवार यांचे जानेवारी महिन्यात विद्युत खांबावरून पडून अपघाती निधन झाले होते. स्वयं रक्तदाता जिल्हा समिती च्या माध्यमातून त्यांनी रक्तदान केले असल्याने त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह निधीचे वाटप करण्यात आले. समितीच्या माध्यमातून एकूण सानुग्रह निधी २० हजार रुपये देण्यात येणार असून ते १० टप्प्यात देण्यात येणार आहे. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पहिल्या टप्प्यातील व काल २२ मार्च २०२२ रोजी दुसऱ्या टप्प्यातील सानुग्रह निधीचे वितरण कुटुंबातील व्यक्तीकडे सुपूर्द करण्यात आले. पहिल्यांदाच एका रक्तदात्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना सानुग्रह मदत निधी देण्यात आली आणि हि व्यवस्था प्रत्येक रक्तदात्यांसाठी लागू राहणार आहे. सदर सानुग्रह निधी स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत, उपाध्यक्ष निशिकांत नैताम, सचिव मनोज पिपरे, कोषाध्यक्ष आकाश आंबोरकर यांच्या देखरेखीखाली ‘स्वयं रक्तदाता गडचिरोली जिल्हा समिती’ च्या बचत रक्कमेतून वितरित करण्यात येत आहे. यात कोणत्याही शासकीय योजनांचा किंवा विमा कंपनीचा सहभाग नाही.
‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ हि गडचिरोली जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यात कार्यरत असून या समितीच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना वेळीच रक्तपुरवठा करण्यात येतो. या समितीच्या माध्यमातून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचा अपघात सानुग्रह केला जातो. अनावधाने जर रक्तदात्याचा अपघाती मृत्यू झाला तेव्हा या समितीच्या माध्यमातून मृत्यू झालेल्या कुटुंबास सानुग्रह देण्यात येतो असे या ‘स्वयं रक्तदाता जिल्हा समिती’ चे विशेष आहे. पहिल्यांदाच एका रक्तदात्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांना सानुग्रह मदत निधी वितरित करण्यात आले. आतापर्यंत अनेक गरजू रुग्णास या समितीच्या माध्यमातून रक्तपुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातच नव्हे तर इतर जिल्ह्यातही या समितीच्या माध्यमातून रक्तदान करण्यास अनेक रक्तदाते समोर येत आहेत.
सानुग्रह निधी रक्कम रक्तदाता ओमकार भोलेनाथ नारदेलवार यांच्या आई- वनिता नारदेलवार आणि वडील- भोलेनाथ नारदेलवार यांच्याकडे सोपवण्यात आली. याप्रसंगी स्वयं रक्तदाता जिल्हा समितीचे अध्यक्ष चारुदत्त राऊत, उपाध्यक्ष निशिकांत नैताम, आक्रोश शेंडे, हरीश नैताम, निकेश कुनघाडकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here