स्वयंपुर्ण प्रेरणादायी अशोक डोमाजी खेवले

856

अशोक डोमाजी खेवले (३४) विवाहित. शिक्षण १२ वी पास, टायपींग मराठी ३०, इंग्रजी ३०, एमएससीआयटी इथपर्यंत शिक्षण. घरी दोन मुली आणि आपण दोघे असा एकंदरीत चार लोकांचा कुटुंब. अपंगत्वाचा प्रकार अस्थिव्यंग असून हा अपंगत्व त्यांना जन्म लाभलेली देणगी आहे. अपंगत्वाची टक्केवारी ८६ टक्के इतकी आहे. हे बोरी येथील रहिवासी असून हे गाव आरमोरी तालुक्यापासून ३४ किलोमिटर पुर्वेला आहे. या गावामध्ये अशोकचा जन्म झालेला. अशोक आणखी दोन भावंड, अशोक हा मधला व आईवडील असा पाच लोकांच्या परिवारामध्ये अशोक अपंग म्हणून वाढला. अशोकला सगळे प्रमाने लंगडू पाटेल म्हणून आदरयुक्त वागविले जाते, त्याचा स्वभाव अगदी शांत संयमी स्थितप्रिय आहे. त्या व्यक्तीला आपल्या अपंगत्वाचा बाहू नाही कि, ओझे पण नाही, नेहमी स्मित हास्य मुद्रेने आपल्या लोभस वाणीने संवाद साधाणारा अशोक सगळयांचा आवडता आहे. अशोकला बऱ्याच कला अवगत आहेत. शिवाय त्याला शेतीच्या कामामध्ये देखील आवड आहे. त्या सर्वगुणसंपन्नतेच्या आधारावार अशोकचा व्यवस्थित उदरनिर्वाह चालतो आहे.
आम्ही आमच्या आरोगयासाठी संस्थेचा काम आरमोरी तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षापासून महिला सक्षीमकरणवर चालू होतं. पण २००९ पासून विकलांग व्यक्तीचे अधिकार या विषयावर कामाला सुरूवात झाली. यामध्ये दिव्यांग व्यक्तीला एकत्र करणे, त्यांचे बचतगट, संघटना बनविणे, त्यांना वेगवेगळया विषयाचे प्रशिक्षण देवून त्यांची क्षमतावृध्दी करणे, योजनेच्या संदर्भाने समाज विकसित करणे आणि ते कसे मागून घेता येतील यासाठी त्यांना बैठकीच्या माध्यमाने एकत्र करून मार्गदर्शन करणे, यातून पुढे आलेला अशोक आज योजनेचा लाभ घेण्यात पुढे आलेला आपल्या दिसतोय. २००९ मध्ये जेव्हा दिव्यांग व्यक्तीच्या कामाला सुरूवात झाली तेव्हा प्रथम अशोकच्या मदतीने एक त्या परिसारामध्ये दिव्यांग व्यक्तीची विकास अपंग परिसर संघ वडधा या नावाने संघटना स्थापन करण्यामध्ये अशोकचा सिंहाचा वाटा आहे. तसेच त्यांनी दिव्यांग व्यक्तीचे प्रमाणपत्र काढून देणे, त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत करणे, तसेच त्यांनी आपल्या गावामध्ये ११ दिव्यांग व्यक्तीचा ५० रूपये मासिक बचत याप्रमाणे संयुक्त अपंग महिला-पुरूष बचत गट बनवून गावातील सगळया दिव्यांग लोकांना एकत्र करून एमएसआरएलएम या अभियानांतर्गत मिळणारे खेळते भांडवल म्हणून मिळणारी १५ हजार रूपयांची योजना मिळवून घेतली. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून अपंग कल्याणार्थ म्हणून ५ टक्के निधी खर्च करायचा असतो ते दरवर्षी मिळवून घेतात. अशोकला येणाऱ्या विविध कला विणकाम, ॲब्राडरी, शिवणकाम हे सगळे पाहता संस्थेने त्यांना एक छोटसं किराणा दुकान लावण्यासाठी आर्थिक मदत केलीली आहे. या दुकानावर अवलंबून न राहता, अशोक विणकाम करतो, अर्गडीचे फुल बनवितो, झुमर बनवितो, तसेच शेतीच्या दिवसात शेतीकामावर जातोय,स्वतः शेती काम उरकुण दुसऱ्याकडे २०० रूपये मजुरीने शेतीची कामे करण्यासाठी जातोय, लोकही त्याला अपंगत्वामुळे चालता येत नाही म्हणून आपल्या पाठीवर मांडून शेतात घेवून जातात, तसेच तो दरवर्षी आपल्या गावामध्ये सुरू होणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीणी रोजगार हमी योजनेच्या कामावर जातोय, त्या कामावर दिव्यांग व्यक्तीला क्षमतेनुसार काम द्यावे म्हणून मागणी करतोय आणि हमखस आपली हजेरी लावतोय. लोकही त्यातील कला, काम करण्याची आवड म्हणून हे सगळे बघून त्याला कोणतीही अट न घालता कामावर रूजू करून घेतात. यावर्षी मजुरांच्या हजेरी घेण्याचा काम तो करतो आहे. २५२ रूपये रोजी प्रमाणे १० दिवस कामावर गेलेला अशोक दिव्यांग व्यक्तीच्या प्रेरणा म्हणून उभा आहे. अशोक सारख्या बऱ्याच दिव्यांग लोकांना आपल्या क्षमतेनुसार काम मिळू लागलेले आहे. त्यामध्ये कोरची, कुरखेडा, आरमोरी, वडसा, गडचिरोली अशा एकुण 26 लोकांना दिव्यांग संघटनेच्या रोजगार हमीचे काम मिळाले आहे.

– संकलन
संगिता तुमडे
विकलांग व्यक्तीचे अधिकार विषयाच्या समन्वयीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here