स्लॅब कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

165

– ५ जण गंभीर जखमी
The गडविश्व
पुणे : येथील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात सुरु असलेल्या एका अंडर-कन्स्ट्रक्शन मॉलचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रात्री साडेदहा ते सव्वा अकराच्या दरम्यान घडली. साईट वरती स्लॅब साठी तयार करण्यात आलेली लोखंडी जाळी अचानक निसटली आणि त्याखाली काम करणाऱ्या कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या साईटवर रात्री उशिरा देखील काम सुरूच होते हि घटना घडली तेंव्हा एकूण 10 मजूर तिथे काम करत होते त्यातील 5 जण या घटनेत मृत्युमुखी पडले असून उर्वरती 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या साऱ्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल होते, सध्या मृत्यूंची ओळख पटवण्याचे काम पोलिस प्रशासन करत असून जखमींना ससून रुग्णालयात नेले असल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here