The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील बरेच लोक कामाकरीता इतर जिल्या त वा राज्यात काही काळाकरीता कुटुंबासमवेत स्थलांतरीत होतात. तथापि स्थलांतरणामुळे सदर कुटुंबातील गरोदर स्त्रिया, स्तनंदा माता व 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या या लाभापासून वंचित होतात. व पर्यायाने बालमृत्यू व कुपोषणास सामोरे जावे लागते. यास आळा घाळण्याकरीता कुठेही स्थलांतरीत होत असले तरी त्या ठिकाणी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत देणाऱ्या पोषण व आरोग्य विषयक सेवांचा लाभ मिळणेकरीता महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत हेल्पलाईन क्रमांक 7588284869 सुरु करण्यात आले आहे.
महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोलीच्यावतीने आवाहन करण्यात येते की, गडचिरोली जिल्यालातील अंगणवाडी केंद्रामार्फत येणाऱ्या स्थलांतरीत लाभार्थ्यांनी हेल्पलाईन क्रमांक 7588284869 वर कॉल करुन एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत देणाऱ्या पोषण व आरोग्य विषयक सेवांचा लाभ घेण्यात यावा असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.