स्त्री ही निसर्गतःच सक्षम : प्राचार्या अरुंधती कावडकर

99

– गोंडवाना विद्यापीठाकडून कर्तुत्वान महिलांचा सन्मान

The गडविश्व
गडचिरोली : प्रत्येक क्षेत्रात महिला काम करताना दिसतात. त्यामुळे त्यांची ओळख तयार होत असते. महिला या नावातच महि आहे म्हणजे महत्ता आहे . प्रत्येक स्त्रीने स्वतःचे आत्मपरीक्षण कराला हवे. आपली बलस्थानं कोणती आहे ते ओळखता आले पाहिजे. स्त्री ही निसर्गतः सक्षम आहे. मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाल्यास त्या संधीचे त्या सोने करतील असे प्रतीपादन सैनिक स्कूल चंद्रपूरच्या प्राचार्या अरुंधती कावडकर यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार समारंभ विद्यापीठ सभागृहात पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळीकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे , मुख्य अतिथी म्हणून सैनिक स्कूल चंद्रपूरच्या प्राचार्या अरुंधती कावडकर, आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडा च्या संस्थापक विश्वस्त शुभदा ताई देशमुख, विशेष उपस्थिती म्हणून प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, डॉ. अनिल झेड. चिताडे यांची उपस्थिती होती.
प्राचार्या अरुंधती कावडकर पुढे म्हणाल्या की, धैर्य, सामर्थ्य, शौर्य, ज्ञान, संवाद, विजयकांक्षा, विवेक, सातत्य, जगण्याची दुर्दम्य इच्छा शक्ति, ही आयुधे प्रत्येक स्त्रीत असणे आवश्यक आहे.
आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेडाच्या संस्थापक विश्वस्त शुभदाताई देशमुख म्हणाल्या, शिक्षणाचे मंदिर म्हणून आपण विद्यापीठाकडे पाहतो. विद्यापीठाने जे पाऊल उचलले आहे. ग्रामसंभाना प्रशिक्षण देण्या संदर्भात ते अतिशय स्तुत्य आहे.
तर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्र-कुलगुरू श्रीराम कावळे म्हणाले, पैशांशिवाय ही अर्थव्यवस्था चालू शकत नाही. तसेच महिलांशिवाय हे जग चालू शकत नाही. महिला कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतात .
तसेच अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले , विद्यापीठात ५० टक्के महिला कर्मचारी कार्यरत आहे. अतिशय मेहनतीने आणि चिकाटीने त्या काम करतात . या महिलांच्या कामाचे प्रतिबिंबही विद्यापीठाच्या प्रगतीत उमटत असते. महिलांसाठी येथे सुरक्षित वातावरण निर्माण झाले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आजचा महिला दिन साजरा केल्याचे केल्याचे सार्थक होईल .
या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ.अनिल झेड. चिताडे यांनी केले. संचालन आणि आभार डॉ. नरेश मडावी यांनी मानले. कार्यक्रमाला विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यादरम्यान कर्तृत्ववान महिलांचा सत्कारही करण्यात आला. यात अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील कोटी गट ग्रामपंचायतच्या सरपंचा भाग्यश्री लेखामी , कोरची तालुका वनहक्क महाग्रामसभेच्या सहसचिव कुमारीबाई जामकातन, स्वयंसेवक पणती स्वयंसेवी संस्था, गडचिरोलीच्या फर्झाना शेख, मेंढा (लेखा) ग्रामसभेच्या सदस्या नंदा दुग्गा, दुधमाळा च्या पोलीस पाटील लताताई उईके यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here