सोलर इन्व्हर्टर बॅटरीसह ८ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त : भामरागड पोलीसांची कारवाई

772

– दोन महिलांसह चार आरोपी ताब्यात
The गडविश्व
गडचिरोली : सोलर इन्व्हर्टर बॅटरीसह ८ लाख १३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई भामरागड पोलीसांनी ८ एप्रिल रोजी केली. या प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून यात २ महिला आरोपींचाही समावेश आहे. शेखर समय्या वानम (कुंभम), सुर्यकला समय्या वानम (कुंभम) दोन्ही रा. दुबापल्ली ता.मंथानी जि.करीमनगर (तेलंगणा), काजल सरय्या दासरी उर्फ दासरवार रा.गोकुळनगर गडचिरोली जि.गडचिरोली, सरय्या समय्या दासरी उर्फ दासरवार रा.भामरागड जि. गडचिरोली असे आरोपीतांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, ७ एप्रिल रोजी भामरागड पोलीस सकाळच्या सुमारास गस्त घालत असतांना ३६ सोलर इन्व्हर्टर बॅटरीने भरलेली एक संशयास्पद टीएस २२ टी ३९०९ क्रमांकाची चारचाकी टाटा एस गोल्ड कंपनीचे मिनी पिकअप आढळून आले. यावेळी आरोपीना अधिक विचारपूस करून चौकशी केली असता आरोपींनी सदर इन्व्हर्टर बॅटऱ्या ग्रामीण रुग्णालय भामरागड येथील भंडारगृहातून चोरी केल्याचे सांगितले. पोलीसांनी खात्री करीत ग्रामीण रुग्णालय भामरागड प्रशासनास कळवून आरोपींकडून चोरी केलेल्या ३६ नाग सोलर इन्व्हर्टर बॅटऱ्या तसेच चारचाकी मिनी पिकअप वाहन, एमएच ३३ एई ०२७२ क्रमांकाची हिरो कंपनीची दुचाकी, मोबाईल, २ लोखंडी कटर, २ लोखंडी रिंग पाने, १ पल्बींग पाना, बॅटरी वायर असा एकूण ८ लाख १३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चारही आरोपींविरुद्ध भामरागड पोलीस ठाण्यात कलम ३८०, ४५४,४५७,३४ भांदवी सह कलम ३/१८१,५/१८०,१३०/१७७ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि दिपक कुंभारे, पोउपनि अभिषेक जंगमवार, पोउपनि संघमित्रा बांबोडे, पोउपनि संकेत नानोटी, नापोशि जिवन कुडे, पोशि निलेश कुळधर, पोशि शरद गुरनुले व पोशि सुनिल सिडाम यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here