सीआरपीएफचे स्पेशल डी. जी. चतुर्वेदी यांनी ११३ बटालियन सीआरपीएफ मुख्यालय धानोरा येथे दिली भेट

220

The गडविश्व
धानोरा : येथील ११३ बटालियन सीआरपीएफ मुख्यालयाला सीआरपीएफचे स्पेशल डीजी एस.एस .चतुर्वेदी (IPS) यांनी १४ एप्रिल रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी कॅम्पच भ्रमण करुण जवानांचे राहणीमान, भोजन तसेच सुरक्षेचा आढावा घेतला. त्यानंतर  सैनिक संमेलनाच्या माध्यमातून बटालियनचे अधिकारी आणि जवान यांच्याशी संवाद साधला व सीआरपीएफच्या कल्याणकारी योजना आणि ऑपेरशन बद्दल मार्गदर्शन केले. तसेच समस्याबाबत विचारपूस करून जवानांसोबत नाश्ता केला. त्यांनी ११३ बटालियन सीआरपीएफ जवानांच्या चांगल्या राहणीमानाचे आणि उच्च मनोबलाचे कौतुक केले.
ते म्हणाले की, सीआरपीएफला केवळ नक्षल समस्येला सामोरे जावे लागते असे नाही तर गावकऱ्यांचा विश्वास जिंकून त्यांना शक्य ती सर्व प्रकारे मदत करावी लागते, त्यासोबतच जवानांना स्वतःला शारीरिक व्यायाम आणि योगासने करून  तंदुरुस्त ठेवण्यास सांगितले जाते.
त्याच बरोबर जी.डी.पंढरीनाथ कमांडंट ११३ बटालियन यांनी परिसरात राबविल्या जाणारे ऑपरेशन्स, सिविक एक्शन कार्यक्रम आणि बटालियनच्या इतर कामांची थोडक्यात माहिती दिली.
यावेळी गडचिरोली सीआरपीएफचे डीआयजी (ऑपरेशनल) मानस रंजन, डीआयजी नागपूर रेंज सीआरपीएफ श्री लोकेंद्र सिंह यांच्यासोबत ११३ बटालियनचे कमांडंट जी.डी. पंढरीनाथ, बटालियनचे द्वितीय कमान अधिकारी, राजपाल सिंग, कुलदीप सिंग, डेप्युटी कमांडंट प्रमोद सिरसाठ आणि बटालियनचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पुरोहित आणि बटालियन चे सर्व अधिकारी व जवान उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here