सिरोंचा वनविभागातील दुर्मिळ गिधाड संवर्धनासाठी वनविभागाकडून विशेष प्रयत्न

176

The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑक्टोबर : सिरोंचा वनविभागामध्ये पांढऱ्या-पाठीचे गिधाड (white rumped vulture), भारतीय गिधाड (long billed / Indian vulture) हे नेहमी आढळून येतात. तसेच Eurapian griffon vulture ही आढळले . गिधाड संवर्धन व सनियत्रंण सिरोंचा वनविभागामार्फत २०१३-१४ पासुन होत आहे. त्यामध्ये विभागाचे गिधाड उपहार गृह कार्यन्वित आहेत. त्यामध्ये कमलापूर वनपरिक्षेत्रातील दामरंचा, खांदला व छल्लेवाडा येथे उपहार गृह आहेत. तसेच देचली वनपरिक्षेत्रात देचली येथे एक उपहार गृह आहे. त्याबरोबरच ५ गिधाड मित्र स्थानिक गावांमधून निवडले आहे. सदर गिधाड मित्र वनविभागाबरोबर सनियंत्रण, उपहार गृहासाठी मृत जनावरे देण्यासाठी गावात माहिती देणे, गावात जनाजगृती करणे ही कामे करतात.
वन्यजीव सप्ताह १-७ ऑक्टोबर निमित्य ३ ऑक्टोबर ला कमलापूर वनपरिक्षेत्रात “गिधाड संवर्धन कमाचा आढावा व गिधाड सनियंत्रण कामांमध्ये सुधारण” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेमध्ये नागपूर येथील शास्त्रज्ञ व वन्यजीव चिकित्सक डॉ. बहार बावीसकर यांनी मार्गदर्शन केले. बावीसकर हे गेले १५ वर्षे मध्येप्रदेश व महाराष्ट्रातील गिधाडांवर काम करत आहेत.
सदर कार्यशाळेत डॉ.बावीसकर यांनी त्यांचे मार्गदर्शनात आतापर्यत सनियंत्रण कशाप्रकारे केले गेले आहे. त्यात काय कमी आढळली आहे यावर मार्गदर्शन व चर्चा झाली.गिधाड मित्रांच्या कामाचा आढावा घेतला गेला. वनकर्मचाऱ्यांचे गिधाड संनियंत्रणातील अडचणी समजून घेण्यात आल्या, त्याबरोबर नविन कोणती बध्दत वापरता येऊ शकते याबाबत मार्गदर्शन केले गेले.
सध्याथितीत गिधाडांचे वाढ होण्यासाठी उपहार गृहांना मृत जनावरांचा नियमित होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले गेले. यासाठी गावांमध्ये वनविभागाने जागृती करणे गरजेचे आहे असे सांगीतले गेले. तसेच उपहार गृहांना पुरवठा होणाऱ्या मृत जनावरामध्ये गिधाडासाठी हानीकारक असलेले औषधे न वापरण्याबाबत पशुवैद्यकीय विभागाशी संपर्कात राहणे गरजेचे असल्याचे सांगीतले गेले. तसेच सनियत्रंण पध्दतीमध्ये नोंदी घेण्याच्या पध्दतीबाबत माहिती दिली गेली.
सदर कायशाळेस देचली, कमलापुर व प्राणहिता येथील वनरक्षक व वनपाल हजर होते. त्याबरोबरच गिधाड मित्र उपस्थित होते. वनपरिक्षेत्र अधिकारी संजोग खरतड व विकास भोयर उपस्थित होते. उपवनसंरक्षक कु.पूनम पाटे हयांनीही मार्गदर्शन केले व गिधाड सनियत्रंणाची पुढील आरखडा सबंधित अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आला. सिरोंचा वनविभाग पशुवैद्यकीय विभागाशी समन्वय साधून काम करेल तसेच गिधाडांची संख्या वाढेल यासाठी सर्व प्रयत्न करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here