सिरोंचा येथील शेतकऱ्यांनी घेतले हवामान आधारित शेती व्यवस्थापनाचे धडे

576

The गडविश्व
गडचिरोली : कृषी विज्ञान केंद सोनापूर गडचिरोली व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान आधारित रब्बी पिकांचे व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम २८ फेब्रुवारी रोजी सिरोंचा व चिंतलपल्ली येथे आयोजीत करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली येथील कृषी हवामाना शास्त्र विषय विशेषज्ञ नरेश पी. बुध्देवार, हवामान निरीक्षक मोहीतकुमार वाय.गणविर, सिरोंचा तालुका व्यवस्थापक ओमप्रकाश लांजेवार तसेच शेतकरी राजमौली राघम, गंगाराम ठाकुर त्याचप्रमाणे सिरोंचा व चिंतलपल्ली येथील शेतकरीी उपस्थित होते.
कृषी हवामाना शास्त्र विषय विशेषज्ञ नरेश पी. बुध्देवार यांनी रब्बी हंगामातील हवामाान आधारीत पिक लागवड तंत्रज्ञान विषयक माहिती दिली. तसेच सद्यास्थितीत खरीप हंगामामध्ये लागवड केलेल्या मिरची पिकावरील विविध किड व रोगांचे प्रादुर्भाव वाढण्यास पोषक हवामान कारणीभुत ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान अंदाज घेवून पिकांवरील किडी व रोगांचे वेळीच व्यवस्थापन केल्यास लागवड खर्चामध्ये बचत होवून निव्वळ नफा वाढतो असे सांगितले. शेतकऱ्यांनी हवामान विषयक कृषी सल्ला पोहचविण्याच्या दृष्टीने गडचिरोली जिल्हयातील तालुकानिहाय कृषी विषयक पिक निहाय माहीती एस.एम.एस. सेवा व्दारे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जाणार असल्याचे सांगितले. यामध्ये दैनंदिन हवामान अंदाज, कृषी विषयक पिक निहाय रोग, किडींचे व्यवस्थापन, शेतीस पुरक व्यवसाय पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन बाबत मार्गदर्शन, पर्यावरण विषयक माहीती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जाणार असल्याचे प्रतिपादन केले.
हवामान निरीक्षक मोहीतकुमार वाय. गणविर यांनी हवामान आधारित कृषी सल्ला प्राप्त करण्यासाठी आपला मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून पुढील पाचा दिवसाचा हवामान अंदाज व कृषी सल्ला प्राप्त करता येईल असे प्रतिपादन केले.

शेतकऱ्यांनी मेघदुत ॲपसह दामिनी ॲपची मदत घ्यावी
जिल्हा कृषि हवामान केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर गडचिरोली मार्फत जिल्हयातील शेतकऱ्यांना हवामानावर आधारित दर मंगळवारी व शुक्रवारी पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला विविध माध्यमाव्दारे देण्यात येतो. तसेच यासाठी तालुकानिहाय व्हॉट्सॲप गृप तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी सदरील सेवेची लाभ घेवून सुधारित शेती करण्यासाठी व सदरील सेवेची माहिती मिळविण्यासाठी 9096406937 व 7666829972 हया क्रमांकावर शेतकरी बांधवांनी आपले नाव व तालुक्याचे नाव सांगुन गृपमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

तालुका व्यवस्थापक ओमप्रकाश लांजेवार यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
सदरा हवामान आधारित रब्बी पिकांचे व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान शेतकऱ्यांना उन्हाळी मुंग वाण आयपीएम 410-3 (शिखा) पिकाचे बियाणे कृषी स्वरूपात पिक प्रात्यक्षिक राबविण्यास वाटप करण्यात आले. उपरोक्त कार्यक्रमास सिरोंचा व चिंतलपल्ली येथील शेतकरी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे आभार मोहितकुमार गणवीर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here