सावली : जमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीची केली हत्या

1325

– आरोपीस पोलिसांनी घेतले ताब्यात
The गडविश्व
सावली, ५ सप्टेंबर : जमिनीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावासह वहिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील गायडोंगरी येथे घडली. मनोहर गुरुनुले (६२) आणि शारदा मनोहर गुरुनुले (५०) असे मृतकांचे नाव असून धनराज गुरुनुले (५२) असे आरोपीचे नाव आहे. सदर घटनेने तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मृतकांची व आरोपी लहान भावाचा जमिनीवरून वाद सातत्याने वाद होत असे. हा वाद सोमवारी विकोप्याला गेल्याने दोन्ही भावात जोरदार भांडण झाले. दरम्यान या भांडणात धनराज गुरुनुले याने मोठा भाऊ मनोहर व वहिनी शारदा यांच्यावर जमीन खोदण्याच्या सब्बलने हल्ला केला. त्यात मनोहर गुरुनुले हे जागीच ठार झाले तर शारदा गुरुनुले यांना जखमी अवस्थेत सुरुवातीला सावली व नंतर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मंगेश मोहड हे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व आरोपी धनराज गुरुनुले याला ताब्यात घेऊन आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत.
(Younger brother killed elder brother and sister in law) (chandrapur) (saoali)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here