साधनांचा विपर्यास आणि स्वतःचा पराजय

229

सध्याच्या परिस्थितीचा मागोवा घेतला तर. अनेक बदल झालेले आपणास दिसतील, इंटरनेटचा जमाना आलय आणि परिवर्तनाला इतकी गती आली कि, क्षणामध्ये अख्या जगाचा इतिहास पुढे येऊ लागलं. एका कवीच्या दोन ओळी लगेच ओठावर येतात. त्या म्हणजे “जहा न पोहुचे रवी. वहा पोहुचे कवी’ कवीच्या अफाट कल्पनाशक्ती मुळे आणि शब्द साठयामुळे जेथे सूर्य पोहचू शकत नाही, तेथे कवी केव्हाच पोहचलेला असतो, त्याच प्रमाणे मोबाइलचा झालेला आहे! या इंटरनेटच्या प्रवेशामुळे बरेच कामे अगदी घरबसल्या होऊन जातात, एका ठिकाणी बसून आपल्या नातेवाईकांचा, मित्र मंडळीचा सुखद समाचार घेता येतो, त्याच प्रमाणे कार्यालयीन कामे, किंवा इतरही कामे खूप जलद गतीने आणि कसलाही त्रास न घेता करता येतो. साधन आली माणूस परिवर्तनशील झाला, यात तीळ मात्रा शंका नाही. साधनाच्या सहाय्याने चंद्र, सूर्य, तारे, अगदी जवळून बघू लागला. हि बाब अतिशय महत्वाची असली तरी काही गोष्टी वगळता आपण यामुळे काही गोष्टी विसरत आणि हरवत चाललोय याकडे लक्ष वेधण्यासाठी मला थोडे लिहावे वाटले म्हणून शब्दाला थोडी कलाटणी देऊन लिहितोय, लिखाणा बद्दल क्षमस्व,
पूर्वी मोबाईल नव्हते काम हळुवार व्हायचे पण, एकमेकाना भेटून त्यांचा शुभसमाचार घेऊन होत. आता काम एका सेकंदामध्ये होतात पण. आपण माणूस माणसाला भेटणं हे जरा दुरापास्त झालेलं आहे, आपण जिवंत आहोत हे फक्त मोबाईलच्या आवाजावरून कळते, खेड्यातील नातेवाईक पावसाच्या सुरुवातीला किंवा कोणतीही सराई आली कि, अगोदर जवळच्या नातेवाईकाना भेटून दोन /चार दिवस थांबायचे. महिला सुख – दुखाचा दळण गप्पा गोष्टीच्या माध्यमातून दळायच्या, पुरुष मंडळी हवामानाचा अंदाज वर्तवायचे, शेतीच्या पावसाच्या चर्चा करायच्या दिल खुलास चर्चा आणि मुक्त संचार आणि जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जोपासायचे. आता फक्त मोबाईलवरून संवाद उरला. सोबत रेंज आणि इंटरनेट असलं कि गड्याला वाटतो आपल्याला काहीच कमी नाही, यांच्यामुळे आत्मियता, आपुलकी नातेसबंध सगळं दुय्यम आणि गौण झालं आमने –सामने कोण आहे, माझ्या शेजारी कोण बसला आहे, हे कोणाच्याही लक्षात येत नाही, आलं तरी करायचं काय? या इंटरनेटमुळेच तर सगळ्या गोष्टी पायाखाली लोळायला लागल्या आहेत., या इंटरनेटमुळे एक गोष्ट पूर्ण विसरून स्वत:ला परभूत केलेल्याचे आपल्याला दिसतो आहे, पूर्वी छोटा बाळ रडलं तर आई त्याला लगेच जवळ घेतली कि तो, शांत व्हायचा. त्याला कळायचं ही आपली आई आहे, कारण जेव्हाचा तो पोटामध्ये सामावला तेव्हा पासून आईची आणि त्याची नाळ जुळली होती, आईचा श्वास त्याला ओळखीचा होता, पण आता हीच जागा मोबाईलमध्यल्या कार्टूननी घेतली, आई मोठ्या अभिमानाने सांगते कार्टून लावून दिल कि, मुलगा छान खेळत राहतो, मला त्रासच देत नाही, लहानपणापासून तो जर मोबाईलचा अधीन असेल तर येणाऱ्या कलावधी मध्ये त्याला डोळ्यांच्या आजाराने ग्रासेल हे आपण पुरती विसरुन गेले आहोत.
मध्यल्या काळामध्ये पब्जी हा गेम आला सगळीकडे मन विदीर्ण करण्याऱ्या बातम्या यायच्या, पब्जीगेममुळे मुलगा मरण पावला, हा कशाचा विपर्यास आहे, आणि कशाचा पराभव आहे, आईबापाचा पोरावर वचक नसण्याचा, मुल घडतात, घडवितो, घडविल्या जातात, कसे घडवायचे यांचे दर्शन घेण्यासाठी आपण दरवर्षी वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो, का? फक्त त्या दिवसापुरती आठवण म्हणून करतो का? नाही. तर त्यांच्या कडून आदर्श घेण्यासाठी त्यांच्या कार्याचा वसा जोपासण्यासाठी, बाबा साहेब आंबेडकर विपरीत परिस्थितीतून मार्गक्रम करून ३२ पदव्या घेऊन आपल्या आत्याच्या आणि वडिलांच्या छत्रछायेखाली वाढून भारतरत्न म्हणून दुनियेला परिचित झाले, शिवाजी महाराज माता जिजाऊच्या संस्काराखाली वाढून स्वतःचे राज्य निर्माण करून, रयेतेचे राजे झाले, शिहांचा छावा म्हणून ओळखले जाणारे, “वाघाच्या जबड्यात घालून हात. पाहतो दात. अशी आमची मर्द मराठाची जात” अवघ्या ३२ वर्षाचा आयुष्य आणि ९ वर्षाची कारकीर्द गाजविणारे आणि औरंगजेबासारख्या शत्रूलाही गर्व वाटावा असे कामगिरी करणारे राजे शंभाजी, जोतीबा सावित्री असे किती नावे द्यावीत आदर्शाची, असे आदर्श पुरुष झाले तेव्हा मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हता. होती ती आपल्या वाडवडिलांच्या संस्काराची शिदोरी, पण आपण किती आदर्श घेतो हि ठरविणे काळाची गरज आहे, नाही तर आपले मुल अमाप पैशामुळे अयाशित वाढून वेगवेगळ्या व्यसनाच्या अधीन जाऊन आपल्याच जन्म दात्याला स्वर्गात पाठवायला मागेपुढे पाहत नाही, हि आजच्या आमच्या पिढीची शोकांतिका आणि आपल्या मातृत्वाचा आणि दातृत्वाचा पराजय आहे.
मध्यल्या काळामध्ये कोरोनाने थैमान घातले सगळी कडे खूप मोठ्याप्रमाणामध्ये आर्थिक, जिवित आणि हिंसात्मक हानी झाली, संचारबंधी असल्यामुळे प्रवासी साधनाच्या अभावामुळे, महत्वाची कामे थांबून जायची म्हणून लोक आपापल्या सोईनुसार गाड्या घेऊन कामे करू लागली, अति उत्तम झाले पण, कोरोनाने तांडव नृत्य केले असले तरी. कोरोनाने मृत्यू पावलेल्यांची संख्या फक्त ७७४ एवदीच होती, पण अपघाती मरणाचे प्रमाण हे कोरोनाच्या मरणदरापेक्षा पट्टीने वाढलेले आहे, वृत्तपत्राचा पान उघडला कि, चित्र येतात ते दुचाकी, चारचाकी, उलटल्याचे आणि मेलेल्या माणसाचे मयत झालेले फोटो. यामध्ये शिखे, नवशिखे, अल्पवयीन मुल गाडीवर स्वार होऊन अंधाधुंदी वेगाने गाडी चालवून मरणाला आमंत्रण देताना दिसतात, असलेल्या साधनाचा विपर्यास होऊ लागलेला आहे, हा होत असलेला अतिरेकी वावर वेळीच थांबविण्याचा पहिला प्रयत्न असावा,
एवढच या लेखाच्या संदर्भाने अधोरेखित करावे वाटले म्हणून लिहिली, यामध्ये कोणावर टीकाटिप्पणी नाही किंवा माझा सामिक्षावादी दृष्टीकोन देखील नाही,

लेखिका
संगिता तुमडे कुरखेडा
७५१७७५९१३९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here