साई मॉडेलिंग ऍकॅडमीच्या स्पर्धकांनी पुण्यात मारली बाजी

733

The गडविश्व
गडचिरोली : ड्रीम टाउन फिल्म स्टुडिओ प्रस्तुत, रायझिंग स्टार डान्स आणि सौंदर्य स्पर्धा २०२२ तळेगाव पुणे येथे २९ मे रोजी घेण्यात आली. यात गडचिरोली जिल्ह्यातील टीव्ही शो विजेत्या, मिसेस इंडिया मनीषा जगदीश मडावी यांच्या मार्गदर्शनात साई मॉडेलिंग ॲकॅडमी येथील स्पर्धकांनी गडचिरोली येथे ऑडिशन देऊन थेट पुणे येथील ग्रँड फिनाले गाठले. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून स्पर्धक आले होते. यामध्येच गडचिरोलीतील स्पर्धकांनी डान्स आणि मॉडेलिंग मध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून सर्वांवर मात करत आपलं वर्चस्व कायम राखले.
यामध्ये किड्स कॅटेगिरी मधून वंशिका मोहन गेडाम ही विजेती ठरली. तर वेदांत वराटकर हा फर्स्ट रनर अप ठरला. मनवा मडावी सेकंड रनर अप ठरली.
टिन कॅटेगिरी मध्ये श्रावणी उईके विजेती ठरली तर आकर्षण विलास नेताम यांना द बेस्ट ऍक्टिव्ह पर्सनालिटी टायटल आपल्या नावे केला, अवनी विलास नेताम यांना बेस्ट मोडूलिऊस टायटल आपल्या नावे केली.
मिस कॅटेगिरी मध्ये चिकित्सा वाडके आणि राणी वंजारी यांनी सबटायटल आपल्या नावे केले.
मिसेस मध्ये कांचन कोवे फर्स्ट रनर अप टायटल आपल्या नावे केली तर स्वाती कोठारे सेकंड रनर अप ठरली तर मनीषा मडावी यांना सबटायटल मिळाला.
मिस्टर कॅटेगिरी मध्ये अब्दुल शेख फर्स्ट रणर अप ठरला तर यश माकोडे, अमन गोलाला, भास्कर मेश्राम हे सबटायटल चे मानकरी ठरले.
नृत्य स्पर्धेत, किट्स कॅटेगिरी मध्ये वृन्दा सरोदे, आस्था शेडमाके तर मिस कॅटेगिरी मध्ये उर्वशी चौधरी हर्ष खोब्रागडे यांचा सहभाग होता. दीपक दूधे यांना बेस्ट प्रोफेशनल फोटोग्राफर व शीतल मेश्राम यांना बेस्ट प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून गेस्ट ऑफ ओनर तर मनीषा मडावी यांना पेसिल गेस्ट व शो स्टॉपर चा मान देऊन सन्मानित करण्यात आला. सर्व स्पर्धकांवर गडचिरोली जिल्हातून व महाराष्ट्रातून कौतुकाचे वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here