सर्वानी वनसंवर्धनाचे जतन करणे आवश्यक : प्रदिप चव्हान

236

– वन्यजिव सप्ताह दिनानिमीत्य कोलारा गेट येथे जिप्सी रॅलीचे थाटात उद्घाटन्
– वन्यप्राण्याच्या वेशभुषेने पर्यटकांचे मने जिंकले
The गडविश्व
ता. प्र / चिमुर, ६ ऑक्टोबर : ‘वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे’ या संताच्या विचारांना साथ देत भारतातील वनस्पती आणि वन्यप्राण्यांचे सरक्षण आणि जतन सर्वानी करावे असे प्रतिपादन वनपरिश्रेत्र अधिकारी प्रदिप चव्हान यांनी वन्यजिव सप्ताह दिनाच्य जिप्सी रॅली प्रसंगी बोलतांना केले.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर , वनपरिश्रेत्र कार्यालय कोलारा (कोर) येथील वनपरिश्रेत्र अधिकारी प्रदिप चव्हान यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मंगळवार ४ ऑक्टोबरला ला जिप्सी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोलारा गेट मुख्य प्रवेशद्वारातून जिप्सी रॅलीला सरपंचा शोभाताई कोयचाडे, उपसरपंच सचिन डाहूले, सदस्य गणेश येरमे, विनोद उईके, अविनाश गणविर, सोनु वैद्य, अरुणा चौधरी, आदी मान्यवरानी हिरवा झेंडी दाखवली व जिप्सी रॅलीचे थाटात उदघाटन पार पडले.

 

यानंतर ५० जिप्सीचा ताफा सातारा, बाम्हणगाव, टेकेपार, तळोधी (ना ), केसलापूर, वन कार्यालय चिमुर, मुख्य मार्गावर भ्रमती करत तहसिल कार्यालय चिमूर जवळ आगमन होताच स्वागत करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी संकपाल ,तहसिलदार प्राजत्ता बुरांडे, पोलीस निरीक्षक मनोज गभने, वन परिश्रेत्र अधिकारी प्रदिप चव्हान यांनी रॅलीला हिरवी दाखवून जिप्सी, चालक, मालक ,पर्यटक मार्गदर्शक यांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
जिप्सी रॅलीत वाघ, अस्वल, आदी वन्य प्राण्यांच्या वेशभुषने नागरिकांची मने जिंकली. दरम्यान वन्य जिव सप्ताह दिनानिमीत्य विविध स्पर्धचे आयोजन करण्यात आले यामध्ये वनावर निबंध स्पर्धा, प्राण्यावर चित्रकला, अनेक स्पर्धकांचे आयोजन केले यात अनेक विद्यार्थ्यनी सहभाग दर्शविला.
कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता वनपरिश्रेत्र अधिकारी प्रदिप चव्हान, गिरसावळे, मेंडुलकर, लोणारे, ठाकूर, जिप्सी चालक, मालक, पर्यटक मार्गदर्शक, वन कर्मचारी,stpf कर्मचारी, पोलीस प्रशासन यांच्यासह कोलारा, सातारा, बामणगाव येथील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले. जिप्सी रॅलीची सांगता अल्पोहाराने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here