शेतात जात असतांना रानडुकराच्या कळपाची धडक : शेतकऱ्याचा मृत्यु

910

– रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी
The गडविश्व
गोंडपिपरी, ३० जुलै : शेतकरी हा आपल्या घरातून शेतात जात असतांना वाटेतच रानडुकरांच्या कळपाने जबर धडक दिल्याने शेतकऱ्याचा मृत्य झाल्याची घटना शुक्रवार २९ जुलै रोजी गोंडपिपरी तालुक्यातील फरडी-हेटी गावालगत घडली. अविनाश भगवान निखाडे (४८) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
फुरडी हेटी, वढोली शेतशिवारात व गावात रानडुकरांनी हैदोस माजवला आहे. दररोज रानडुकरांचे हल्ले शेतकऱ्यांवर होत आहे. यामुळे नागरिकही दहशतित आहे. अशातच शेतकरी अविनाश निखााडे हे सकाळी ८ वाजताच्या सुमारास घरून शेतात जाण्यास निघाले असता गावाबाहेर काही अंतरावर वाटेतच रानडुकरांच्या कळपाने अचानक त्यांना जबर धडक दिली. यात मोठयाप्रमाणात निखाडे यांच्या शरीरातून रक्तस्त्राव होवू लागला. लागलीच उपचाराकरिता रूग्णालयात दाखल करत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने गावात हळळळ व्यक्त करण्यात येत असून शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here