The गडविश्व
प्रतिनिधी / पेंढरी : येथून ३ किमी अंतरावर असलेल्या दिंडवी येथे सोमवारी रात्री एका राहत्या घरात इन्वेटर शॉर्ट सर्किट मुळे आग लागून घरात असलेल्या महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. पौर्णिमा ऊत्तम बल (२९) असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्राप्त महितुनुसार मागील दोन दिवसांपासून पावसाने वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्याने झाडे पडून वीज खंडित झाली होती अश्यात मृतक सायंकाळी वीज नसल्याने इन्वेटर सुरू करून काम करीत होती दरम्यान इन्वेटर ला शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली, जवळपास साड्या आणि कपडे होते, मृतकाचे परिवार किराणा दुकान चालवीतात, सोबतच पेट्रोल ची विक्री सुद्धा करतात आगीच्या दरम्यान पेट्रोल आणि खाद्य तेल जवळपास असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले व त्या आगीत पौर्णिमा हिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच गावातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत घर बेचिराख झाले होते. अशात परिवाराचे लाखोचे नुकसान झाले आहे. मृतकाचे पती उत्तम बल हे दिंडवी गावात वास्तव्यास आपल्या पत्नी व आई सोबत राहत होते. मागील तीन वर्षांपूर्वी उत्तम चे भाऊ यांचे अपघातात मृत्यू झाला त्याचा दुःख आवरत असतांना उत्तम चे वडील हृदयविकाराणे मृत्यू पावले अशात शोक पचवीत असताना आता पत्नीचा जळून मृत्यू झाल्याने बल परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.