शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त होणार

146

– कोरची मुक्तिपथ तालुका समितीची बैठक

The गडविश्व
कोरची, २७ जुलै : शहरातील संपूर्ण शासकीय कार्यालये व्यसनमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ तालुका संघटकाच्या सहकार्याने नोडल अधिकाऱ्यांची निवड करण्याचा निर्णय मुक्तिपथ तालुका समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार गजभिये, नपंचे प्रशासकीय अधिकारी हाक्के, पीएसआय रवी मनोहर, शिक्षण विभागाचे वाघमारे, बीडीओ एच.के.दोडके, इजामसाय काटेंगे, सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल, वनपरिक्षेत्र अधिकारी एल.एम. ठाकरे, वनपाल एस.एन. राठोड, मुक्तिपथ तालुका संघटक निळा किन्नाके, जसविंदर शहारे आदी उपस्थित होते.
आतापर्यंत तालुक्यात १४ ग्रापं समित्या पुनर्गठीत करण्यात आल्या असून उर्वरित ग्रामपंचायत समित्यांचे ठराव तालुका समीतीला सादर करण्याचे ठरविले. शहरातील व ग्रामीण तंबाखू विक्रेत्यांवर मुक्तिपथ व स्थानिक प्रशासनाच्या पथकाने दंडात्मक कारवाई करणे. उर्वरित वॉर्ड समीत्या व शहर संघटना गठीत करणे. आतापर्यंत कोरची तालुक्यातील २९ शाळांमध्ये तंबाखूमुक्तचे फलक लावण्यात आले असून शिक्षण विभागाने रॅली काढून जनजागृती करणे. संपूर्ण शासकीय कार्यालयांना कोटपा कायदा २००३ संदर्भातील पावती बुक सादर करण्याचे आदेश दिले. वनपरीक्षेत्र अधिकारी बेडगाव व पोलीस स्टेशन, ग्रापं यांच्या माध्यमातून टेकाबेदड या गावातील दारुविक्री बंद करण्यासाठी नदीनाले-शेतशिवार परिसर पिंजुन काढावेत असे आदेश देण्यात आले, महीला आर्थीक महामंडळ तालुका समन्वयक यांच्या माध्यमातून शहरातील संघटनांनी अवैध दारू विक्रीबंदीचे ठराव घेणे, उमेद अभियानाचे माध्यमातून बचत गट सक्षम करुन गावगावातील अवैध दारू बंदी करण्यास सहकार्य करण्यास सुचविण्यात आले आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here