शाबास… महाराष्ट्रातील ११ पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहीर

563

– तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशभरातील एकूण १५१ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश
The गडविश्व
नवी दिल्ली, १४ ऑगस्ट : वर्ष २०२२ च्या केंद्रीय गृहमंत्री पदकांची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या  महाराष्ट्रातील ११ पोलिसांना पदक जाहीर झाले असून देशभरातील एकूण १५१ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
गुन्ह्याच्या तपासातील उच्च व्यावसायिक मानकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि तपासातील अशा उत्कृष्टतेला मान्यता देण्याच्या उद्देशाने या पुरस्काराची सुरूवात २००८ पासून करण्यात आली. यंदा महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक उत्कृष्टता तपास’ जाहीर झाले आहेत.

राज्यातील पोलिसांमध्ये
१) कृष्णकांत उपाध्याय, उप पोलीस आयुक्त
२) प्रमोद भास्करराव तोरडमल, निरीक्षक
३) मनोज मोहन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक
४) दिलीप शिशुपाल पवार, निरीक्षक
५) अशोक तानाजी विरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
६) अजित भागवत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
७) श्रीमती राणी तुकाराम काळे, सहाय्यक निरीक्षक
८) दिपशिखा दिपक वारे, निरीक्षक
९) सुरेशकुमार नानासाहेब राऊत, निरीक्षक
१०) जितेंद्र बोडप्पा वनकोटी, निरीक्षक
११) समीर सुरेश अहिरराव, निरीक्षक
यांचा समावेश आहे.

यासह केंद्रीय अन्वेषण ब्यूरो ( सीबीआय)चे १५, मध्य प्रदेशमधून १० पोलीस अधिकारी-कर्मचारी, उत्तर प्रदेशातून १० पोलीस अधिकारी-कर्मचारी, केरळमधून पोलीस ८, राजस्थानमधून ८पोलीस , पश्चिम बंगालमधून ८ आणि उर्वरित राज्यांमधून तसेच केंद्रशासित प्रदेशातून पोलीस आहेत. पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांमध्ये  २८ महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here