शहरातील व गावातील अवैध दारूविक्रेत्यांवर करणार कारवाई

222

-मुक्तिपथ आरमोरी तालुका समितीची बैठक संपन्न
The गडविश्व
गडचिरोली : मुक्तिपथ दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम अंतर्गत मुक्तिपथ आरमोरी तालुका समितीची बैठक तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील शहरासह गावातील अवैध दारू व तंबाखू विक्रेत्यांवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार समितीच्या केलेल्या पुनर्गठनुसार सदस्य व कार्यप्रणाली याबाबत सर्व सदस्यांना माहिती देण्यात आली. तालुका समितीच्या अध्यक्षपदी तहसीलदार व सचिवपदी तालुका संघटक यांची निवड करण्यात आली. मुक्तिपथ तालुका समितीच्या माध्यमातून शासकीय कार्यालय तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न करणे, ग्रापं स्तरावर समितिची निवड करणे, पानठेला व किराणा दुकान धारकाना सुचना नोटिस देऊन तंबाखु विक्री बंद करने, तालुक्यातिल अवैध दारु विक्रेत्यांवर केस करणे, मोठ्या तंबाखु विक्रेत्यावर वारंवार कार्यवाही करणे तसेच अवैध दारू व तंबाखूविक्रेत्यांवर शहर व गावपातळीवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई करणे आदी ठराव बैठकीत घेण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी इंदूरकर, एनएसएसचे प्रा. एस. एम. सोनटक्के, विस्तार अधिकारी एम. एस. मडावी, विस्तार अधिकारी जी.डी. राठोड, युवारंगचे प्रफुल खापरे, चंदा राऊत, उमेदच्या अर्चना मोडक, मनोज काळबांधे व मुक्तिपथ तालुका संघटिका नीलम हरिणखेडे उपस्थित होते.

‘The गडविश्व’ वरील बातम्या मिळविण्यासाठी आपल्या परिसरातील व्हाट्सॲप ग्रुप्स ला व्हा जॉईन

‘The गडविश्व’ वरील बातम्या मिळविण्यासाठी आपल्या परिसरातील व्हाट्सॲप ग्रुप्स ला व्हा जॉईन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here