वैनगंगा नदीच्या पुलावरील कठड्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन

187

– मनसे, युवारंग, प्रहार ,माकपा, शिवसेना, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचा आंदोलनात सहभाग
The गडविश्व
आरमोरी : नागपूर- गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे २०२० मध्ये आलेल्या ऑगस्ट महिन्याच्या महापुरात वाहून गेले होते. जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी संबंधित विभागाला १९ जानेवारी २०२१ ला पत्राद्वारे सदर काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र संबंधित विभागाने याकडे कानाडोळा केला. व वर्ष उलटूनही नदी पुलावर कठडे दुरुस्ती करण्यात आली नाही. वैनगंगा नदीवरील कठड्यांची दुरुस्ती न झाल्याने पुलावर अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारत येत नाही. हि बाब लक्षात घेता मनसे, युवारंग, प्रहार ,माकपा, शिवसेना, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी तर्फे वैनगंगा नदीवर काल २ फेब्रुवारी २०२२ पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष रणजित बनकर, युवारंग चे अध्यक्ष राहुल जुआरे, प्रहार सेवक निखिल धार्मिक, माकपा चे जिल्हा महासचिव अमोल मारकवार, युवारंग चे उपाध्यक्ष मनोज गेडाम ,शिवसेना तालुका अध्यक्ष महेंद्र शेंडे, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाणे ,सचिव दीपक सोनकुसरे ,अंकुश गाढवे, युवारंग चे नेपचंद्र पेलणे, संघटक सुरज पडोळे, प्रशांत सोरते, करण गरमळे, जियाउल पठाण, मनसे चे आशुतोष गिरडकर, किशोर जंवजालकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here