विविध गावातील ३४५ स्पर्धक धावले दारूमुक्तीसाठी

153

-मुलचेरातील सात गावांमध्ये उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑक्टोबर : मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मुलचेरा तालुक्यातील विविध सात गावांमध्ये मुक्तिपथ मॅराथॉन दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण ३५४ जणांनी दारूमुक्तीची मशाल पेटवून स्पर्धेत सहभाग घेतला होता. सोबतच स्पर्धेच्या माध्यमातून गावातील अवैध दारूविक्री विरोधात लढा देण्याची तयारी दर्शविली.
मल्लेरा येथे ४९ स्पर्धक सहभागी झाले होते. यात माजिकराव गणपत आरके, श्रीनिवास राजू मरापे, अश्विनी एकनाथ आलाम व कुसुम प्रकाश मरापे हे यशस्वी ठरले आहेत,. यावेळी उपसरपंच उज्वला मरापे, पोलिस पाटील देवाजी ओडेंगवार, माजी ग्रापं सदस्य सरिता तोरे, चिन्ना कोवे, लालू मरापे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कोपरअल्ली येथील स्पर्धेत एकूण ४८ स्पर्धकांनी घेतला होता. यात गावातील प्रतीक मडावी, गिरीजा दिलीप मेश्राम, सुरेश कन्नाके, रोशनी गरतुलवार हे यशस्वी ठरले. यावेळी गाव संघटन सचिव वंदना चौधरी, अध्यक्ष निर्मला आउतकर, सदस्य विद्या कुळमेथे, मोतीराम आत्राम उपस्थित होते. लगाम येथील स्पर्धेमध्ये ४२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत मोतीराम तलांडे, प्रीतम मडावी, रुपाली मडावी, गीता मडावी यांनी विजय संपादित केले. यावेळी सरपंच दीपक मडावी, उपसरपंच मधुकर गेडाम, ग्रामसेवक दुर्गे, ग्रापं सदस्य राजू पंब्बलवार, उमा आत्राम, शैला आत्राम, तंमुस अध्यक्ष श्रीकृष्ण गावडे, मनीषा गेडाम, सुमित्रा मडावी उपस्थित होते. यासह मोहुर्ली येथे ४०, रेंगेवाही ४२, मुकडी टोला ७६, अडपल्ली माल येथील स्पर्धेत ४८ स्पर्धक सहभागी झाले होते. यावेळी शेकडो नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here