– विधानमंडळ प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांची माहिती
The गडविश्व
मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज ३० जून रोजी बहुमत चाचणीसाठी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन विधान भवन, मुंबई येथे सकाळी ११.०० वाजता अभिनिमंत्रित केले होते. या अधिवेशनात सर्व विधानसभा सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र आता हे अधिवेशन संस्थगितकरण्यात आले आहे. यासंदर्भात विधानमंडळ प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.
राज्यात सुरु असलेल्या घडामोडी बघता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित केले होते मात्र आता ज्या प्रयोजनासाठी सदर अधिवेशन अभिनिमंत्रित करण्यात आले होते ते प्रयोजन आता आवश्यक राहिले नसल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (२), उपखंड (क) द्वारे त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हे अधिवेश संस्थगित केले आहे. असे विधानमंडळ प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांची माहिती दिली आहे.
राज्यपाल @BSKoshyari यांनी ३० जून रोजी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित केले होते. ज्या प्रयोजनासाठी अधिवेशन अभिनिमंत्रित केले होते, ते प्रयोजन आता आवश्यक राहिले नसल्याने राज्यपालांनी हे अधिवेशन संस्थगित केले आहे- विधानमंडळ प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांची माहिती pic.twitter.com/FOIo4NNdsH
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 29, 2022