वाघाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

974

– सावली तालुक्यातील उपरी येथील घटना
The गडविश्व
ता.प्र / सावली, ३०ऑक्टोबर : शेत जमीन परिसराला लागुन आपली स्वतःची जनावरे राखन करत असतांना शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सावली तालुक्यातील उपरी येथे घडली. खुशाल कवडू शेट्टे (५०) रा. उपरी ता. सावली जि. चंद्रपूर असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
उपवनक्षेत्र व्याहाड खुर्द अंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. या परिसरातील हजारो हेक्टर शेत जमीनी जंगल परिसरात आहे. सोबतच या भागात मोठ्या प्रमाणात वाघाचा धामाकुळ असून वाघाची नेहमीची दहशत निर्माण होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेच्या दिवशी शेतकरी खुशाल शेट्टे हे आपली जनावरे गाई, म्हशी चराईसाठी जंगल परिसरातील कक्ष क्र.१९८ लगत चराई करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने म्हशी वर हल्ला केला. दरम्यान म्हशीने इतरत्र धाव घेतली असता वाघाने गाई म्हशी राखणाऱ्या शेतकऱ्यावर झडप घेतली यात शेतकरी जखमी झाले. जखमी शेतकऱ्याने आरडाओरड केल्याने वाघाने तेथून पळ काढला व लगतच सदर परिसरात सरपनाकरिता गेलेल्या काही महिला पुरुष यांनी जखमी शेतकऱ्याची ओरड पाहून त्या ठिकाणी धाव घेतली व तात्काळ जखमी शेतकऱ्याला गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
सदर जखमी शेतकऱ्याला शरीरावरती अनेक जखमा असल्याचे बोलले जात आहे. सदर घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या धान पिकाचा हंगाम हाती येत असताना सर्वत्र शेतकरी आपल्या शेतावर असतात त्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन काम करण्याची वेळ शेतकऱ्यांवर निर्माण झाली आहे या भागातील वन्यजीवांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here