वाघाच्या हल्ल्यात महिला ठार : मानव वन्यजीव संघर्ष शिगेला

1589

– वाघाचे मानवावरील हल्ले थांबता थांबेना
The गडविश्व
मूल, १५ नोव्हेंबर : कापूस काढण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करुन जागीच ठार केल्याची घटना मंगळवार दुपारी ३ वाजताच्या सुमारास मूल तालुक्‍यातील जानाळा नजीक घडली. कल्पना अरुणा लोनबले (४५) रा. कांतापेठ असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहीतीनुसार, कांतापेठ येथील श्रीमती कल्पना अरुण लोनबले ह्या शेतावर कापुस काढण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान दबा धरुन बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करुन जागीच ठार केले व काही अंतरावर फरफटत नेले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वनविभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला असून शेतशिवारतही वाघाचे हल्ले वाढल्याने शेती करायची कशी असा सवाल शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे.

#tigerattack #chandrpurnews #mul #forestmul

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here