वाघाच्या हल्ल्यात बैल जखमी

921

– परिसरातील आठवड्यात दुसरी घटना, परिसरात खळबळ
The गडविश्व
सावली, १६ सप्टेंबर : तालुक्यातील निलसनी पेडगाव परिसरात वाघाच्या हल्यात बैल गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार १५ सप्टेंबर ला सायंकाळी ५.०० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काशिनाथ माधव चुधरी रा.पेडगाव यांच्या मालकीचे सदर जखमी बैल आहे.

गावातील गुराखी देवाजी मेश्राम व आबाजी पेंदोर नेहमीप्रमाणे गावातील गुरे चारण्यासाठी जिल्हा परिषद शाळेमागील अंदाजे अवघ्या १००० फुटावरील अंतरावर डोंगरावर नेले. परतीच्या वेळेस दबा धरुन बसलेल्या वाघाने बैलावर झडप घातली. इतर जनावरे सैरावरा पळू लागले पण तोपर्यंत वाघाने बैलाची खोंड आपल्या जबड्याने पूर्णतः फोडून काढली. गुराख्याने वेळीच आरडा ओरड केल्याने वाघाने जंगलाकडे पळ काढला. बैल गंभीर जखमी झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले.
सदर घटना गावात पसरताच ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेतली.

याच आठवडयात सोनापुर येथे स्वतःच्या मालकीचे जनावर चराईसाठी घेऊन गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना सावली वनपरीक्षेत्र येणाऱ्या सामदा बूज क्षेत्रातील सोनापूर बीटात मागील चार दिवसाअगोदर घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे.

सावली तालूक्यातील सोनापूर, कापसी व्याहाड, उपरी ला लागून मोठ्या प्रमाणावर जंगलंव्याप्त परिसर असून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आहे. सोनापूर येथील प्रमोद गणपत मोटघरे स्वताच्या मालकीचे जनावर चराई साठी सामदा बीट सोनापूर पेडगाव च्या जवळीस जंगलात नेले होते त्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर व त्यांच्या बैलावर हल्ला करून जखमी केले होते.

तालुक्यातील वाघ आणि बिबट्याचा हल्याच्या घटनेत दिवंसेदिवस वाढ होत आहे तरी वन विभागाने दखल घेऊन वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सोनापूर, कापसी, नी.पेडगाव सामदा येथील ग्रामस्थानी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here