– बंदुकीने गोळी घालुन केली होती हत्या
The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : जिल्ह्यातील लाहेरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लाहेरी येथील किशोर दोघे कुड्यामी (२३) याची ९ ऑगस्ट रोजी रात्रोच्या सुमारास गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र हत्यारा कोण ? याबाबत तपास सुरु असताना संशयीत आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने जादुटोण्याच्या संशयावरून हत्या केल्याचे कबुल केले आहे. राजु बोगामी असे आरोपीचे नाव असून पोलीसांनी अटक केले आहे.
भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील किशोर दोघे कुड्यामी या २३ वर्षीय युवकाची ९ ऑगस्ट रोजी रात्रोच्या सुमारास अज्ञातांनी हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र हत्यार मोकाट होता, पोलिसांकडून अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता हत्याराचा शोध घेणे सुरु होते. दरम्यान काल १२ ऑगस्ट रोजी गुन्ह्यातील संशयीत राजु बोगामी यांचेकडे चौकशी केली असता, त्यानेच जादुटोण्याच्या संशयावरून किशोर दोघे कुड्यामी यास भरमार बंदुकीतून गोळी झाडुन खुन केल्याची कबुली दिली आहे. यावरून आज १३ ऑगस्ट रोजी आरोपी राजु बोगामी यांस अटक करण्यात आली असून, आरोपीस कोर्टात हजर करण्याची तजविज ठेवण्यात आली आहे. सदर गुन्ह्याबाबत कारवाई सुरु असुन, पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक महादेव भालेराव व त्यांचे पथक करत आहेत.
