लाडज गावासभोवताल तिन दिवसापासून पुराचे पाणी, जनजीवन विस्कळीत

1308

– आपातकालीन सेवा करीता बोट देण्याची गावकऱ्यांची प्रशासनाला मागणी
– २०२० साली आला होता महापूर,
– गोसेखुर्दचे पाणी सोडल्याने पुरस्थिती

The गडविश्व
देसाईगंज, १४ जुलै : वडसा-ब्रम्हपूरी मार्गावरील वैनगंगा नदी काठावर असेलेल्या लाडज गावाला मागील तिन दिवसांपासून पुराने वेढलेले आहे त्यामुळे येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाकाडे आपतकालीन परिस्थितीकरिता बोट उपलब्ध करून दयावी अशी मागणी केली आहे.
गोसेखुर्द धरणाचे सर्वच दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसत आहे. ब्रम्हपूरी तालुक्यात वडसा-ब्रम्हपूरी मार्गावरील वैंनगंगा नदीकाठावर लाडज गाव आहे. याठिकाणी मागील तिन दिवसापासून पुरस्थिती निर्माण झाली असून गावाचा तालुक्याशी संपर्क तुटलेला आहे. २०२० साली या गावात महापूर आला होता. संपूर्ण गावात पुराचे पाणी साचलेले होते. हेलीकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांना स्थलांतरीत करावे लागले होते. त्यावेळी हे गाव सर्वांच्या परिचयाचेचे झाले होते मात्र आता मागील तिन दिवसांपासून गावाच्या सभोवताल पुराचे पाणी असून येथील जनजीवन विस्कळीत झाले व गावकऱ्यानी आपतकालीन बोटीची व्यवस्था व आवश्यक सुविधा पोहचविण्याची मागणी करूनही अद्यापही येथे कोणतीच मदत पोहचली नसल्यासाचे येथील नागरिकांनी सांगितले.लाडज येथे चिखलगाव व सावंगी या गावामार्गे जाता येतो मात्र गावाच्या सभोवताल पुर असल्याने सर्वच मार्ग बंद झाले आहे. गावात आरोग्य सुविधेचा अभाव असून लहान मुले, गरोदर माता, वृध्द नागरिक यांकरिता आपतकालीन बोट उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे मात्र अदयापपर्यंत कोणतीही आपतकालीन मदत पोहचली नाही. सदर गावात जवळपास ४०० घरे वसलेले असून यातील जवळपास १०० घरे हि दरडीवर वसलेले आहे. पुराचे पाणी वाढल्यास कधीही दरड कोसळण्याची शक्यता आहे. तसेच २०२० सालच्या पुराची पुरावृत्ती होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे तात्काळ प्रशासनाने याची दखल घेवून आवश्यक ती मदत करावी अशी मागणी अमोल रामकृष्ण मोहुर्ले यांच्यासह गावकऱ्यांतून होत आहे.

https://twitter.com/gadvishva/status/1547496118346555395?s=19

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here