रोहीत्र जळाल्याने धान पीक जगविणे धोक्यात

184

The गडविश्व
देसाईगंज : तालुक्यातील नैनपुर येथिल शेतशिवरातील कृषी पंपाचे विद्युत रोहित्र जळल्यामुळे कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. काही शेतकऱ्यांचे रोवणे होण्यास बाकी आहेत आणि झालेल्या धान रोवणे पीक जगविणे कठीण झाले आहे.
या जळलेल्या विद्युत रोहितत्रावर ६३ होल्ट विद्युत भार असतांना अधिकारी लोकांच्या मनमानी कारभारामुळे आणि गैरमार्गाने खरीप २०२१ हंगामात १० ते १२ शेतकऱ्यांना नविन वीज पुरवठा देण्यात आला त्यामुळे या रोहित्रावर १२५ होल्ट विद्युत भार झाला त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त भार झाल्याने विद्युत रोहित्राणे पेट घेतला. याबाबतची माहिती सतत ८ ते १० दिवसापासून वीज वितरण कंपनीच्या अभियंता यांना देण्यात आली होती. विद्युत रोहीत्र जळल्यामुळे शेतातील पाणी जागच्या जागी जिरत आहे त्यामळे धान पीक कसे जगावचे ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामळे विद्युत रोहित्र तत्काळ बदलविण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here