The गडविश्व
गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त }माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य~ ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. सदर स्पर्धासाठी 15 मार्च, 2022 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाने }माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य~ या मध्यवर्ती संकल्पनेवर पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. या मध्ये प्रश्न मंजुषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, व्हिडीओ तयार करण्याची स्पर्धा, पोस्टरची डिझाईन करण्याची स्पर्धा व गाण्याची स्पर्धेचा समावेश आहे. प्रश्नमंजुषा स्पर्धेव्दारे निवडणुकीबाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्पर्धकांनी तपशीलवार मार्गदर्शक तत्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी. प्रवेशिका सर्व तपशिलासह voter-contest@eci.gov.in येथे ई मेल कराव्यात. तसेच स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा. सदरच्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली संजय मीणा यांनी केले आहे.
