राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आविस मध्ये जाहीर प्रवेश

539

– जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार
The गडविश्व
अहेरी : रेपनपली व कमलापूर, ताटीगुड्म, छल्लेवाडा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आविस मध्ये जाहीर प्रवेश केले.
विशेष म्हणजे रेपनपली येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे इरफान शेख गेल्या वीस वर्षापासून आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात पक्षासाठी काम करत होते मात्र गेल्या काही महिन्यापासून नाराज होऊन त्यांनी आज आविस मध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य चंद्रु कूळमेथे, सुधाकर दुर्गे, नरेश मडावी, संदीप सिडाम, राहुल मडावी, अजित भासरकर आदिंनी प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार केला.
आदिवासी विसद्यार्थी संघाचे विदर्भ नेते माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन सदर प्रवेश करण्यात आला.
जि.प.अध्यक्ष अजय कंकडलवार यांच्या अहेरी येथील जन संपर्क कार्यालयात सदर प्रवेश कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, आविसचे शहर अध्यक्ष प्रशांत गोडशेलवार, आविसचे ग्रामीण अध्यक्ष इरसाद शेख, राकेश सड़मेक, कार्तिक तोगम, प्रकाश दुर्गे, विनोद रामटेके आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here