– हनुमान जयंती दिनी रामपूर चेक येथे भेट देऊन विविध विषयांवर चर्चा
The गडविश्व
चामोर्शी : रामपूर चेक येथील हनुमान मंदिर बांधकामास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन माजी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.
रामपूर चेक येथे आज माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट दिली असता विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या दरम्यान रामपूर चेक येथील नागरिक व हनुमान मंदिर व्यवस्थापन समिती यांनी मंदिराच्या कामाबद्दल चर्चा केली यावेळी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मंदिराच्या बांधकामाकरिता सर्वतोपरी मदत करणार असे आश्वस्त केले. तसेच पुढे बोलतांना म्हणाले की गावपातळीवरील प्रत्येक समस्या मार्गी लावण्याचे काम आपल्याकडून निरंतर सुरू राहील त्यासाठी पाहिजे ते मदत आपल्याकडून केली जाईल असे ते म्हणाले.
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)