राज्यातील सर्व सरकारी वाहने आता इलेक्ट्रिकच असतील : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

524

THE गडविश्व
वृत्तसंस्था /मुंबई : नववर्षाच्या सुरुवातीला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिकच (EV) असतील, असे मंत्रीआदित्य ठाकरे यांनी घोषित केले आहे. खरंतर राज्य सरकारने हा निर्णय याआधीच घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी १ जानेवारी २०२२ पासूनच होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले आहेत. आपल्या या निर्णयाला पाठींबा दिल्यानिमित्ताने त्यांनी तीनही ज्येष्ठ मंत्र्यांचे आभार मानले आहेत. पर्यावरण प्रदुषणविरहीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here