राज्यातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

363

– कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला निर्णय

THE गडविश्व
मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचे सर्व वसतिगृह बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त वसतिगृहाची व्यवस्था असेल कारण ते सध्या त्यांच्या मायदेशी परतणे अवघड आहे. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना देवून वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी राज्यातील अकृषी आणि तंत्रनिकेतन कॉलेज 15 जानेवारीपर्यंत बंद राहतील, अशी देखील घोषणा केली.
“सर्व विद्यापीठ, महाविद्यालयांशी निगडीत वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वसूचना आणि कालावधी देवून वसतिगृह बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जे विद्यार्थी परदेशातून आले आहेत त्यांचे वसतिगृहाची सुरक्षा बंद करु नये. सर्व काळजी करुन त्यांचं शिक्षण झालं पाहिजे. कारण ते सध्या त्यांच्या देशात परत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुरता वसतिगृह सुरु ठेवले आहेत”, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here