रांगोळी प्रदर्शनीच्या माध्यमातून जागतिक कुष्ठरोग दिन २०२२ उत्साहात साजरा

330

The गडविश्व
गडचिरोली : “सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था”, चंद्रपूर व गडचिरोलीच्या पुढाकाराने सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) गडचिरोली आणि अलर्ट इंडिया, मुंबई यांच्या संयुक्त समन्वयाने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे रांगोळी प्रदर्शनीच्या माध्यमातून जागतिक कुष्ठरोग दिन (३० जानेवारी २०२२) उत्साहात साजरा करण्यात आला.
“डोंट फरगेट लेप्रसी” (कुष्ठरोगाचा विसर पडू देवू नका) या संकल्पनेवर आधारीत रांगोळी प्रदर्शनात कुष्ठरोगाचे कारण, कुष्ठरोगाची लक्षणे आणि त्यावरील उपचार तसेच कुष्ठांतेयांना समाजात सन्मान, प्रतिष्ठा व आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी बोधपर संदेश रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आले.
यावेळी डॉ. अनिल रूडे, जिल्हा शल्य चिकित्सक-गडचिरोली, डॉ. साळुंखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक- गडचिरोली, डॉ. सचिन हेमके, सहाय्यक संचालक, कुष्ठरोग कार्यक्रम- गडचिरोली,
डॉ सुनिल मडावी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी गडचिरोली, डॉ. धुर्वे, निवासी आरोग्य अधिकारी गडचिरोली, डॉ. बनसोडे, उमाकांत शेंडे, अध्यक्ष, व मिलिंद बारसिंगे, कोषाध्यक्ष- सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था, गेडकर, वांढरे, निमवैद्यकीय अधिकारी, राजेन्द्र ठोके, महेश दंदे, शिवचरण ठाकरे, कुष्ठरोग तंत्रज्ञ उपस्थित होते.
तसेच उपस्थितांनी कुष्ठांतेयासोबत भेदभाव करणार नाही अशी शपथ घेतली.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अलर्ट इंडीयाचे संदीप माटे, शरद निकुरे, तसेच सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचे सदस्य, स्वयंसेवक व समाजप्रवर्तक यांनी विशेष प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here