The गडविश्व
मुंबई : बेकायदा फोन टॅपिंग केल्याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला आहे. आज शुक्रवारी त्यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. पुढील आदेशापर्यंत अटकेसारखी कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सुनावणीदरम्यान, या प्रकरणी तीन वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय या प्रकरणी अन्य अधिकारीही सहभागी असताना केवळ शुक्ला यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सकृतदर्शनी मत न्यायालयाने शुक्ला यांना दिलासा देताना नोंदवले. यानंतर न्यायालयाने शुक्ला यांच्यावर अटकेसारखी कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.