रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियान शुभारंभ संपन्न

182

The गडविश्व
गडचिरोली : जनहित ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था येनापुर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली द्वारा संचालित रक्तदाता शोधमोहीम व जनजागृती अभियान शुभारंभ काल 12 जानेवारी 2022, (राष्ट्रीय युवा दिवस निमित्याने) रोजी सायंकाळी 7 वाजता ऑनलाईन ZOOM APP च्या माध्यमातून करण्यात आले.
कोविड 19 परिस्थितीमद्ये जिल्ह्यात रक्ताची टंचाई भासू नवे व वेळेवर गरजू व्यक्तीला रक्त मिळवून देण्याकरिता रक्तदाते शोधण्याचा व जनजागृती करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे.
यावेळी उद्घघाटक म्हणून फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय गडचिरोलीचे प्रा. डॉ. विवेक गोर्लावार उपस्थित होते. तसेच अध्यक्ष जनहित ग्रामीण विकास बहु. संस्था येनापुरचे वैभव सुरेश बुरमवार व प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधिकारी ओरंगाबाद डॉ. अश्विनी बनसोड उपस्थतीत होते. तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गडचिरोली अविनाश गुरनुले, जनहित ग्रामीण विकास बहु. संस्थेचे सचिव लुकेश सोमनकर, जनहित ग्रामीण विकास बहु. संस्था सौ. सूनिताई बंडावार, प्रशांत गावडे, आयुष दुधे, मिलिंद भैसारे, सुषमा वासनिक, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील हुलके, प्रास्ताविक रविंद्र बंडावार, आभार रवींद्र जक्कुलवार यांनी मानले.
उद्धघाटन प्रसंगी गोर्लावर यांनी मार्गदर्शन करतांना युवकांना रक्तदान करण्याकरिता प्रेरित केले. कोरोना महामारीच्या काळात रक्तदान करने मोलाचं कार्य आहे. हे कार्य म्हणुन नाही तर एक चळवळ म्हणून काम केले पाहिजे या करीता सर्वांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. गरजूंना रक्तदान करणे हे आजच्या काळात पुण्याचं कार्य आहे. अशा प्रकारे रक्तदान करण्याकरीता युवकांना प्रेरीत केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अश्विनी बनसोड यांनी मागदर्शन करतांना युवकांनी रक्तदानाविषयी मनात कोणताही पूर्वग्रह न आणता रक्तदान केले पाहिजे आणि रक्तदान केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही हे समजावून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here