येरकड येथील धान खरेदी केंद्रावर उपप्रादेशिक व्यवस्थापकांचे कारवाईचे संकेत

386

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १६ नोव्हेंबर : तालुक्यातील येरकड धान खरेदी केंद्रावर खरिप हंगामात साठा पुस्तिकेनुसार १३८१ पोते ८९९.९२ क्वि.धान्य शिल्लक असुन याची किंमत १७ लाख ४३ हजाराच्या घरात आहेत. सदर धान्याची काळजी घेणे संस्थेची जबाबदारी होती मात्र ति त्यांनी पार पाडली नाही त्यामुळे धान खराब झाले. धान पाखर झाल्याने शासनाचे नुकसान झाले त्यामुळेच सदर संस्थेवर कारवाई करणार असल्याचे संकेत उपप्रादेशिक कार्यालयाने प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक अंतर्गत आधारभुत खरेदी योजना हंगाम २०२१-२२ खरिप योजने च्या वतीने २८६३० पोती खरेदी करण्यात आली त्या धान्याची एकूण किंमत २,२२,१६,६८६ येवढी आहे. त्यापैकी प्रत्यक्षात २७२४९ पोती भरडाईसाठी पाठवण्यात आले तर साठा पुस्तिकेनुसार १३८१ धान्याचे पोते शिल्लक असून सदर शिल्लक धान्य ला जबाबदार कोण? असा प्रश्न धानोरा तालुक्यातील जनता विचारत आहे.
आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था येरकड येथे धान्य साठविण्याकरिता गोडावून नाही., येथिल धान्याची उचल्ल वेळीच होणे गरजेचे होते ते उचलण्यात आले नाही. सततच्या पडलेल्या पाण्याने काळजी न घेतल्याने धान्य खराब झालेत. धान पाखर झाल्याने उचल करण्याची मानसिकता नसल्याचे बोलल्या जात आहे. कारण चालु हंगामात कोणत्याही धान खरेदी केंद्रातील धान्य पाखर झालेच नाही आणि या धान्याचे ई-लिलाव केव्हा होईल हे हि कुणीच सांगु शकत नाही. सदर खरेदी केंद्रावर हे धान्य शिल्लक राहिलेच कसे ? आणि या धान्याला जबाबदार कोण ? चालू हंगामात धान्य उचलण्यात आले वेळच्यावेळी आणि हे उचल करत सदर धान्याचे संरक्षण करण्याची सर्वस्व जबाबदारी संस्थेची होती परंतु त्या धान्याचे नियोजना अभावी सदर धान्य केंद्रावर सडत असून या धान्याची रक्कम कोणाकडून वसूल केल्या जाईल, की शासन यांना सूट देईल असा प्रश्नही निर्माण केल्या जात आहे. याबाब उपप्रादेशिक व्यवस्थापक यांना विचारणा केली असता सदर संस्थेवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here