युक्रेनमध्ये अडकले महाराष्ट्रातील १२०० विद्यार्थी : विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारचा पुढाकार

390
फोटो सौजन्य ANI

– संपर्कासाठी जारी केला नंबर
The गडविश्व
मुंबई : युक्रेन-रशियातील युद्ध चिघळत चालले आहे. युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील १२०० विद्यार्थी अडकले असून यातील ३२० विद्यार्थ्यांचा संपर्क झाल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. यात राज्यातल्या अनेक शहरांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
राज्यातल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी नंबर आणि ईमेल जाहीर केला आहे. लँडलाईन नंबर 02222027990, मोबाईल क्रमांक 9321587143 आणि ईमेल controlroom@maharashtra.gov.in जाहीर केले आहेत. या नंबरवर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सरकार या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सर्व मदत करत आहे, त्यांना जी मदत हवी आहे ती देण्यास महाराष्ट्र सरकार कटिबद्ध असल्याचेमदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार उपाययोजना करत आहेत, युक्रेनमधून विमानाने आणणे शक्य नाही, त्यामुळे बाजूच्या देशातून आणता येणे शक्य असेल तर आम्ही तयारी दर्शवली आहे, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करावी अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार दिली आहे. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना मोफत आणण्याची घोषणा केली आहे, ते न झाल्यास आम्ही आणण्यास तयार आहोत, अशी माहितीही मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here