‘या’ उमेदवारांची होणार गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस विभागात थेट नियुक्ती

1978

– शासनाने काढले आदेश, तब्बल ८९ उमेदवारांची थेट पोलीस विभागात नियुक्ती

The गडविश्व
गडचिरोली : नक्षल्यांच्या हल्यात अथवा नक्षल विरोधी कार्यवाहीत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांचे मुले असलेल्या उमेदवारांना थेट गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस विभागात पोलीस शिपाई/ चालक पोलीस शिपाई पदावर नियुक्ती करण्यात येणार आहे. तसे निर्देश शासनाने दिले असून गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक यांच्या वतीने तसे बिनतारी संदेश जिल्ह्यातील पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रातील सर्व प्रभारी अधिकारी यांना पाठिविले आहे. यात तब्बल ८९ उमेदवारांची थेट पोलीस विभागात नियुक्ती होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या आस्थापनेवरील पोलीस शिपायाचे काही पद रिक्त आहेत. रिक्त पदामधुन नक्षल्यांच्या हल्यात अथवा नक्षल विरोधी कार्यवाहीत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांचे मुले असलेले उमेदवारांची पोलीस शिपाई/ चालक पोलीस शिपाई पदावर थेट नियुक्ती करण्यात येणार आहे आहे.

‘या’ तारखेला कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

नियुक्ती करण्यात येणाऱ्या सर्व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून मूळ कागदपत्र व प्रत्येक मूळ प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रति २६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता एकलव्य सभागृह पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे न चुकता हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित न झाल्यास उमेदवार नोकरी करण्यास इच्छुक नाही असे गृहीत धरण्यात येईल व त्यानंतर उमेदवाराची कोणतीही तक्रार एकूण घेतल्या जाणार नाही असे सुद्धा म्हटले आहे.

आवश्यक कागदपत्र

-शाळा सोडल्याचा दाखल
– ७ वी पास गुणपत्रिका
– १० वी किंवा १२ पास ची गुणपत्रिका (असल्यास)
– जन्मदाखला
– मागासवर्गीय उमेदवार असल्यास जातीचे प्रमाणपत्र (असल्यास जात वैधता प्रमाणपत्र)
– अधिवास (डोमेसाइल) प्रमाणपत्र
– संगणक अहर्ता प्रमाणपत्र (एमएससीआयटी)
– हलके मोटार वाहन चालक परवाना ( LMV-TR)
– आधार कार्ड /पॅन कार्ड/इलेक्शन कार्ड
– पासपोर्ट फोटो -3

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here