‘मॅरेथॉनमधून’ दारूविक्रीविरोधात दाखवली एकी

203

– मारोडातील महिलांसह ५९ जणांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, २४ सप्टेंबर : तालुक्यातील मारोडा येथे गाव संघटना व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गावातील महिलांसह ५९ पुरुष, युवक, युवती सहभागी होत दारूविक्रीमुक्त गाव निर्माण करण्यासाठी एकी दाखवली.
‘दारू व तंबाखू मुक्तीसाठी धावूया’ ही या मॅरेथॉन स्पर्धेची मुख्य थीम आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखूमुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. संघटना बनवून पुढे कृती करावी, या उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची सुरवात तंमुस अध्यक्ष पांडुरंग नेंचलवार, सरपंच जगदीश मडावी, भाग्यश्री सोदीरवार, गाव संघटनेचे अध्यक्ष सवीता गडगेलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दारूमुक्तीची मशाल पेटवून करण्यात आली. या स्पर्धेत २७ महिला, १८ युवती, ७ युवक व ७ पुरुषांनी सहभाग घेतला होता. दरम्यान चारही गटातून विजेते निवडण्यात आले. यात महिलांमध्ये प्रथम क्रमांक सविता गडगेलवार, युवतीतुन तृप्ती सोदीरवार, युवकांमध्ये प्रथम क्रमांक राहुल मोहितकर तर पुरुष गटातून मुखरू दुदलवार यांनी यश प्राप्त केले आहे आहे. यशस्वी स्पर्धकांना मेडल, जिल्हाधिकारी व डॉ. अभय बंग यांच्या सहीचे प्रमाणपत्र, व्यसनमुक्ती विषयावरील गाण्याचे पुस्तक इत्यादी साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन तालुका संघटक अमोल वाकुडकर, उप संघटक रेवणाथ मेश्राम, स्विटी आखरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here