– माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजभे यांच्या हस्ते सत्कार
The गडविश्व
चिमूर : आ.मा.ज.विद्यार्थी युवा संघटना विदर्भ व ब्राईटएज फाऊडेशन,भिवापूर च्या वतीने आज २७ मार्च रोजी अभिनंदन सोहळा, श्रमदान व नियोजन बैठक संपन्न झाली.
यावेळी मॅजिकच्या अल्पश्या योगदानातून नोकरीवर लागलेल्या अश्विनी भरडे (PSI), पूजा ढोणे (PSI) यांच्या मातोश्री श्रीमती माधुरीताई ढोणे व मॅजिक विद्यार्थी भूषण नन्नावरे यांच्या मातोश्री सौ. हर्षकलाताई नन्नावरे यांचा सत्कार माजी राज्यमंत्री तथा मॅजिक चे प्रमुख मार्गदर्शक डॉ. रमेशकुमार गजभे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला श्रीकांत ऐकुडे, संदीप खडसंग, संदीप धारने, विवेक चौखे, विलास चौधरी, सुभाष नन्नावरे, सचिन मानगुडधे, निखिल राणे , ईश्वर हजारे , रोशन जांभुळे व नितेश श्रीरामे मॅजिक परिवार सदस्य- विद्यार्थी युवा संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.
तसेच या दरम्यान ग्रामशाखा-भगवानपुर विद्यार्थी व ग्रामस्थानी उपस्थित राहून मॅजिक परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले. सोबतच भविष्यकालीन कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी बैठक घेऊन मुलीचे पाच दिवसीय निवासी कराटे प्रशिक्षण १० मे ते १४ मे २०२२, लहान मुलांसाठी १ महिन्याचे १५ मे ते १५जून २०२२ निवासी अंकुर प्रशिक्षण, जात वैधता प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यशाळा २१ व २२ मे २०२२ ला घेण्याचे नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी पाहुण्याच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.