मॅजिक बस इंडिया फाउंडेशन संस्थेच्या सर्वांगीण शिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत शैक्षणिक साहित्याचे वितरण

326

– गोगाव येथे शैक्षणिक साहित्याचे वितरण
The गडविश्व
गडचिरोली : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या सर्वांगीण शिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत गडचिरोली तालुक्यातील गोगाव येथे २७ जुलै ला शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मुलांना त्यांच्या अध्यापनात सहकार्य मिळावे, मुलांच्या शिक्षणात रस कायम राहावा व त्यांना शाळेतील अध्यापन करण्यासाठी मदत मिळावी म्हणून मॅजिक बस इंडिया फाउंडेशन या संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
शैक्षणिक साहित्यामध्ये बॅग,नोटबुक, चित्रकला वही, रंगीत पेपर बॉक्स, रंग कांडी बॉक्स, खडू बॉक्स, पेन,पेन्सिल, खोडरबर, शॉपनर, ब्लॅक बोर्ड या सर्व साहित्याची किट बनवून विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आली.
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही संस्था, गडचिरोली जिल्ह्यातील १२०० मुलांसाठी खेळाच्या माध्यमातून विकास हा कार्यक्रम राबवित आहे. कार्यक्रमाअंतर्गत जीवन कौशल्य, संवाद कौशल्य, शिकण्यातून शिकणे स्व व्यवस्थापन व विषयात्मक शिक्षण गाव समुदाय शिक्षण केंद्र ( सी एल सी ) द्वारे विज्ञान गणित इंग्लिश आदी कार्यक्षेत्रात काम करीत आहे. शैक्षणिक साहित्य कार्यक्रम वितरणाला अध्यक्ष म्हणून गडचिरोली चे जिल्हा शिक्षण अधिकारी निकम, विशेष अतिथी म्हणून मानव विकास मिशन नियोजन विभाग गडचिरोली सागर पाटील, सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूलच्या प्राचार्या सौ. कविता ताई पोरेड्डीवार प्राचार्य, केंद्रप्रमुख खोब्रागडे, अडपल्ली ग्रामपंचायत च्या सरपंचा सौ. स्मिता शेंडे, अडपल्ली ग्रामपंचायत चे सचिव मेश्राम, अडपल्ली ग्रामपंचायतीचे उपसरपंच भोयर, वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा प्रशांत लोखंडे उपस्थित होते. यादरम्यान उपस्थितांनी अतिशय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले. व पुढील शैक्षणिक वाटचाली करिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विषय शिक्षिका बारूबाई शेडमाके, जीवन कौशल्य शिक्षिका मेघा गोवर्धन, समुदाय समन्वयक कु.प्रतीक्षा शेंडे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी सन्माननीय प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाने तालुका समन्वयक सन्माननीय देवेंद्र हिरापुरे यांच्या सहकार्याने संपन्न झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here