– वनविभागाचा पुढाकार
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ३ ऑक्टोबर : तालुक्यातील मुरुमगाव येथील वनपरिक्षेत्र कार्यालय पश्चिम मुरुमगावच्या वतीने रविवार २ ऑक्टोबर २०२२ रोजी महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री याच्या जयंतीचे औचित्य साधून तसेच वन्यजिव सप्ताहाच्या निमित्ताने सिदेंसूर येथे गाव स्वच्छ करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
स्वच्छता अभियान कार्यक्रम वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश भडांगे, वनपरिक्षेत्र कार्यालय पश्चिम मुरुमगाव यांच्या माग॔दश॔नाखाली घेण्यात आले. काय॔क्रमादरम्यान गावात रॅली काढून वन्यजीव व वना विषयी जनजागृती करून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सर्व गाव स्वच्छ करण्यात आले.
या कार्यक्रमात वनरक्षक जि.एच.टेकाम, वनरक्षक बि.के.ढोने, वनरक्षक ए.जी.कूलेटी, क्षेत्र साहाय्यक देशपांडे मुरुमगाव, वनरक्षक कू.एस.एच. भूरकूडे, कू.सि.डी.बोगा क खेडेगाव, व सिंदेसूर गावातील नागरिक उपस्थित होते.