– आ. वि. का. संस्था जिल्हा कर्मचारी युनियनची पत्रकार परिषदेतुन मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २५ ऑगस्ट : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मुरूमगाव येथे धान्याची अफरातफर केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणामध्ये व्यवस्थापक हे प्रत्यक्ष एकटे जबाबदार नसून या प्रकरणासाठी तेथील प्रशासकीय यंत्रणेसह या प्रकरणाशी संबंधित असणारे सर्व व्यक्तीसह त्यांच्या बँक खात्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. जेणेकरून या प्रकरणामुळे जिल्ह्यातील इतर संस्थांना गालबोट लागणार नाही. प्रकरण नेमकं कोणामुळे घडले, कसे घडले त्याला जबाबदार कोण कोण आहेत याची सविस्तरपणे सखोल चौकशी करण्यात यावी, सदर प्रकरणात अधिकारी समाविष्ट असल्याचे म्हणने कर्मचारी युनियनचे आहे. त्यामुळे दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा आविका युनियन च्या वतीने २२ ऑगस्ट २०२२ ला धानोरा येथिल सार्वजनिक बांधकाम विभाग येथिल सभा गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.
पत्रकार परिषदेतत पुढे सांगितले की काही व्यापारी व अधिकारी यांच्या संगणमतातुन हा प्रकार घडला.
मुरूमगाव येथे यापूर्वी कोणत्याही पद्धतीचा उन्हाळी खरेदी केंद्र दिलेले नव्हते परंतु नेमके याच वर्षी उन्हाळी खरेदी केंद्राला मंजुरी कशी काय दिली ? त्यात कोणते सातबारा ऑनलाईन केले? ७/१२ वर खरिप व रब्बीची नोद आहे का ?अशा पद्धतीचा प्रश्नही पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित करण्यात आले. तसेच येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय धानोरा यांनी व्यवस्थापकावरती दबाव टाकून कोणत्याही पद्धतीचे धान उपलब्ध करून न देता जबरदस्तीने बिल पाडण्यात भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला. सदर पत्रकार परिषदेतून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र व्यवस्थापकाला जबाबदार धरून पोलीस कारवाई केल्या जाते. मात्र प्रशासकीय यंत्रणा मोकळे राहते त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सविस्तर चौकशी करण्याची मागणी या पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेला हेमंत शेंद्रे जिल्हाध्यक्ष आविका संस्था कर्मचारी युनियन, महेंद्र मेश्राम सचिव आविका संस्था कर्मचारी युनियन , बि.डी. लाडे सचिव मोहली, एल. एस. घोसेकर सचिव कुरखेडा, पी.एफ. हटवार सचिव येगलखेडा, आर.बि मस्के सचिव गेवर्धा, दिलीप कुमरे सचिव देलनवाडि, आर. एस. हलामी सचिव रांगी, डी.जे. बोरसरे सचिव कारवाफा, राँकेश कोकडे केंद्रप्रमुख सोडे, जगदीश नवघडे केंद्रप्रमुख दूधमाळा, माणिक दरवडे केंद्रप्रमुख आंधळी आदी मान्यवर उपस्थित होते.