The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १३ ऑगस्ट : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर अमृत महोत्सवी वर्षाचे अवचित्य साधून उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
सदर उपक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज आर चव्हाण उपस्थित होते. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन रासेयो प्रमुख प्रा.ज्ञानेश बनसोड यांनी केले. याप्रसंगी प्रा डॉ पी एन वाघ, प्राध्यापक डॉ. डी बी झाडे, प्राध्यापक डॉ सचिन धवनकर, प्राध्यापिका डॉ पठाडे, प्राध्यापक डॉ राजु किरमिरे, प्राध्यापक डॉ लांजेवार, प्राध्यपिका डॉ जंबेवार, प्राध्यापक डॉ गणेश चुधरी, प्राध्यापक कैलास खोब्रागडे, प्राध्यापिका वटक मॅडम, प्रा.पुण्यप्रेड्डीवार, बी जी वाळके, प्राध्यापक डॉ संजय मुरकुटे, प्राध्यापक भैसारे, प्राध्यापक तोंडरे व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
