मानव विकास बस अभावि खासगी वाहनाने शालेय विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

760

– विद्यार्थ्यांच्या जिवनाची हमी घेनार तरी कोण ?
The गडविश्व
ता. प्र / धानोरा : देश आझादीचा अमृत महोसव साजरा करीत आहे. परंतु हाच महोत्सव साजरा करण्याकरिता विद्यार्थी नसतिल तर ? कारण शाळा सुरु होवून दिड महीना उलटूनही शालेय विद्यार्थ्यांकरिता शाळेत जाण्यासाठी मानव विकासच्या बसचा पत्ताच नसल्याने वाहना अभावी खासगी अवैद्य वाहनाने ३० ते ४० विद्यार्थी कोबुन कोबून, वरती, बाजुला लटकलेल्या अवस्थेत धोकादायक प्रवास मोहलि येथिल माँडेल स्कुल आणि जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी करतानांना दिसतात. त्यामुळे यांच्या जीवनाची हमी घेणार तरी कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ब्रह्मपुरी आगाराची धानोरा- रांगी -आरमोरी -ब्रम्हपुरी मार्गावर नियमित बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी व कर्मचाऱ्यांनी केली आहे. तरी एस.टी .महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप काळापासून म्हणजे गेल्या सात-आठ महिन्यापासून रांगीला येनाऱ्या तसेच धानोरा जानाऱ्या सर्वच बस बंद आहेत. इतक्या महिन्याचा कालखंड उलटूनही बस सुरु करण्यात न आल्याने आरमोरी-रांगी – ब्रह्मपुरी व धानोरा परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. परंतु बंद असलेली बस किमान शाळा सुरु झाल्यानंतर सुरु होईल अशी अपेक्षा विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्रवाशी, व्यापारी, नागरिक अशा सर्वानाच होती. पण दिड महिन्याचा कालावधी उलटुनही ब्रम्हपुरी आगाराची बस सुरुच न झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता बस अभावी शालेय विद्यार्थ्यांची गोची झालेली आहे. शाळेत जायचे कसे असा प्रश्न विद्यार्थी विचारीत आहेत. शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुण देण्यासोबतच बाहेरगावी शिक्षणा घेण्याकरिता मानव विकासच्या बसेस शासनाने उपलब्ध करून दिल्या परंतु सध्या या बसेसचा पत्ताच लागत नाही. ब्रम्हपुरी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा करूनही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे नागरीक म्हणतात. मात्र कमालीचा मनस्ताप व त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे . ब्रह्मपुरी -धानोरा परिसरातील नागरिकांना ये-जा करण्याकरिता गेल्या आठ महिन्यापासून ब्रह्मपुरी आगाराची एसटी बस सुरुच न झाल्याने लोकांना कमालीचा त्रास सोसावा लागत आहे. हि बस ब्रह्मपुरी येथून सकाळी ८.३० वाजता सुटून रांगीला १०.०० वाजता पर्यंत येवून मोहलीला १०.३० वाजता पोहचत होती. हा वेळ शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य आहे. याज मार्गाने नियमित दोन फेऱ्या करून सायंकाळी ब्रह्मपुरी आगारात पोहोचत होती. या बसने मोहगाव, विहीरगाव,कोरेगाव, वानरचुवा, रांगी, खेळी कन्हाळगाव, महावाडा येथिल विद्यार्थी याच बसने शाळेत येणं-जाणं करित होते. परंतु या रस्त्यावर कोणतेही वाहन चालत नाही त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेला मुकावे लागत आहे. तसेच धानोरा रांगी विहिरगाव कोरेगाव परिसरातील नागरिक, व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, कर्मचारी, रुग्ण आदींना धानोरा-आरमोरी- ब्रह्मपुरी तालुका मुख्यालय याठिकाणी जाण्याकरता या बसने अत्यंत सोयीचे झाले होते. त्यामुळे सदर बसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. या मार्गावर अनेक खेडे आहेत. राज्य मार्गाचे बांधकाम देखील पूर्ण झालेले आहे. सदर मार्गावर ब्रह्मपुरी-रांगी-धानोरा एसटी बस सुरू नसल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

ब्रह्मपुरी रांगी धानोरा परिसरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन त्वरित बससेवा पूर्ववत सुरू करावे.

●आम्हा मुला- मुलींना मोहली येथिल शाळेत ये-जा करण्याकरिता बस उपलब्ध करुन द्यावे. बस नसल्याने कधी कधी शाळेला मुकावे लागते.
– वैभव भोयर (वर्ग १०) जि.प.हायस्कुल मोहली.

● मोहलि शाळेत शिक्षण घेनाऱ्या मुलांना प्रवासाचे साधन नसल्याने अवैध वाहनाचा आधार घेवुन धोकादायक प्रवास करावे लागने हेच चुकिचे आहे.
– सौ.फालेश्वरी प्रदिप गेडाम
सरपंचा ग्रामपंचायत रांगी

● आमच्या ह्क्काची बस नसल्याने शाळा पकडण्यासाठी मिळेल त्या साधनाचा वापर करावा लागतो.
– अमर कुनघाडकर (वर्ग ९वा) माँडेल स्कुल मोहली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here