– महागाव येथे नवीन हातपंप
The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय महागांव (खुर्द) येथे जिल्हा परिषद अंतर्गत नवीन हातपंप मंजूर झाले. सदर हातपंपाचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा हस्ते नुकतेच करण्यात आले.
गावात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावा याकरिता जिल्हा परिषद अंतर्गत हातपंप मंजूर करण्यात आले. सदर हातपंपाचे भूमिपूजन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अहेरी नगरपंचायत चे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, ग्रा.प.सदस्य राजेश दुगै , सोनु गर्गम , चद्राजी रामटेके, भिमा पानेम, वंदना दुगै, गुरुदास दुगै, प्रमोद रामटेके, तिरूपती मेरूगु, ओदयालू पेडंलीवार, रमेश पेडंलीवार, लिगेश दहागावकर, आदि उपस्थित होते.
गावामध्ये नवीन हातपंप होत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.